विशेष प्रतिनिधी
रायगड : कोकणातील मनमोहक सागरी किनारे, निसर्ग सौन्दर्याची भुरळ कुणाला न पडावी तर नवल. सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग कपूर आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एनए (NA) जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. Ranveer, Deepika The allure of Alibag
त्या जागेच्या काही कागदोपत्री कामासाठी ते आज आलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. या जोडीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली. सिनेकलाकार उच्च राहणीमानासाठी सतत चर्चेत असतात. मुंबई मधील उच्चभ्रू सोसायटी असो वा सुट्ट्या घालविण्यासाठी त्यांनी घेतलेले रिसॉर्ट. मात्र, शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी हक्काचा निवास असावा, अशी इच्छा प्रत्येकाची असते.
अलिबाग , मुरुड व अन्य पर्यटनस्थळी अनेक अभिनेते, राजकीय मंडळी यांचे फार्म हाऊस, घरे थाटली आहेत. आजकाल सर्व कलाकारांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत आहे. येथील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र निसर्ग सहवास मिळावा, यासाठी ते हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात . रणवीर आणि दीपिकाच्या जागेत दोन बंगले असून नारळ, सुपारीची बाग आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App