मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेशात आणायची यूपी पोलीसांची जय्यत तयारी; पंजाबमधून बांदा जेलमध्ये आणणार


वृत्तसंस्था

बांदा – उत्तर प्रदेशातला कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याला पंजाबच्या रोपड जेलमधून उत्तर प्रदेशातील बांदा जेलमध्ये आणण्याची यूपी पोलीसांनी जय्यत तयारी केली असल्याची माहिती बांदा रेंजचे पोलीस महानिरीक्षक के. सत्यनारायणन यांनी दिली आहे. As per Supreme Court’s order arrangements are being made for BSP MLA Mukhtar Ansari’s transfer from Punjab to Banda jail K Satyanarayan,IG, Banda range

सुप्रिम कोर्टाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करून मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेशात आणण्यात येईल. त्यासाठी बंदोबस्ताची चोख व्यवस्था करून यूपी पोलीसांची एक टीम पंजाबला पाठविण्यात येईल. मुख्यार अन्सारीला आणताना वाटेत येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुंडांच्या आणि गँगस्टर्सच्या हालचालींवर गुप्त पाळत ठेवण्यात येईल, असे सत्यनारायणन यांनी स्पष्ट केले. मुख्तारला पंजाबमधून यूपीत आणून बांदा जेलमध्ये ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सत्यनारायणन यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.-मुख्तार अन्सारीला एन्काउंटरची भीती

मुख्तार अन्सारीला एन्काउंटरची भीती वाटते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्व उत्तर प्रदेशात गुंड आणि गँगस्टर्सवर कायद्याचा दंडा चालवून त्यांचे अड्डे, बेकायदा इमारती, हॉटेल्स, अलिशान महाल बुलडोझर लावून उध्दवस्त केले आहेत. मुख्तार अन्सारीच्या टोळीतील सगळ्या गँगस्टर्सवर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यांच्यापैकी अनेकांचा एन्काउंटर झाला आहे.

मुख्तारवर यूपीमध्ये हत्यांसह १५ गुन्हे दाखल आहेत. पण एका खंडणीच्या केसमध्ये पंजाब पोलीसांनी त्याला रोपड जेलमध्ये बंद करून ठेवले आहे. तो जामीनही मागत नाही आणि केस पुढेही सरकत नाही. त्यामुळे यूपी पोलीसांनी सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन मुख्तारचा ताबा मिळवला आहे. त्याची उद्या अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. त्याच्या पत्नीने राष्ट्रपतींकडे मुख्तारच्या जीविताची हमी मागितली आहे.

As per Supreme Court’s order arrangements are being made for BSP MLA Mukhtar Ansari’s transfer from Punjab to Banda jail K Satyanarayan,IG, Banda range


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात