निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची

Election Commission responds to Mamata's allegations on voting process in Nandigram

Election Commission : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदिग्राममधील एका मतदान केंद्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वागणे संशयाच्या भोवऱ्यात आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या त्यांच्या आरोपाला उत्तर देताना हे संकेत दिले आहेत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या लेखी तक्रारीला चुकीची म्हटले आहे. मतदान केंद्रावर ममता बॅनर्जी यांच्या वर्तनाचा पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही असल्याचे त्यांनी सांगितले. Election Commission responds to Mamata’s allegations on voting process in Nandigram


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदिग्राममधील एका मतदान केंद्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वागणे संशयाच्या भोवऱ्यात आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या त्यांच्या आरोपाला उत्तर देताना हे संकेत दिले आहेत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या लेखी तक्रारीला चुकीची म्हटले आहे. मतदान केंद्रावर ममता बॅनर्जी यांच्या वर्तनाचा पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी नंदीग्राममधील मतदानादरम्यान मुख्यमंत्री (ज्यांना झेड प्लस सुरक्षा आहे) भाजप आणि तृणमूल समर्थकांमधील तणावात अडकल्या होत्या. त्यांना जवळजवळ तासभर एका खोलीत राहावे लागले, नंतर सुरक्षा दलाने त्यांना बाहेर काढले.

ममतांनी थेट निवडणूक आयोगावरच आरोप केले आहेत. ममता म्हणाल्या की, आयोग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेचे पालन करतोय. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, सकाळपासूनच त्यांच्या पक्षाने 63 तक्रारी केल्या आहेत, पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. मतदान केंद्राबाहेर व्हीलचेयरवर बसलेल्या ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, ‘आम्ही याप्रकरणी कोर्टात जाऊ. आम्हाला हे मान्य नाही.’

त्यांनी घटनास्थळावरून बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना कॉल करून तेथील परिस्थितीविषयी सांगितले. त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोगाला कायदा व सुव्यवस्था नीट सांभाळता न आल्याने अशी परिस्थिती ओढवली आहे. परंतु आता आयोगाने ममतांच्या तक्रारींना चूक ठरवून झेड प्लस सुरक्षेत वावरणाऱ्या ममतांवरच संशय व्यक्त केला आहे.

Election Commission responds to Mamata’s allegations on voting process in Nandigram

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात