यूपीतला गँगस्टर नेता मुख्तार अन्सारीला दोन आठवडयांच्या आत पंजाबमधून यूपीत परत पाठविण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश;मुख्तारला वाटतेय एन्काउंटरची भीती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात १५ पेक्षा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला गँगस्टर नेता मुख्तार अन्सारी याला येत्या दोन आठवड्यांच्या आत पंजाबच्या रोपड जेलमधून हलवून उत्तर प्रदेशात परत पाठवून द्यावे, असे आदेश सुप्रिम कोर्टाने पंजाब पोलिसांना दिले. मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेशात आपल्या एन्काउंटरची भीती वाटत असल्याने तो वेगवेगळी कारणे दाखवून पंजाबच्या जेलमध्येच दोन वर्षे बंद राहात आहे. Gangster Mukhtar Ansari must Be Transfered To Uttar Pradesh Jail From Punjab, orders supreme court

पंजाबचे काँग्रेस सरकारही त्याला उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात देण्याची टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतो आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सरकार त्याला रोपड जेलमध्ये खास संरक्षण देत असल्याची चर्चा आहे.


पंजाबमध्ये मुख्तार अन्सारी विरोधात १० कोटींच्या खंडणीचा फक्त एक गुन्हा दाखल आहे. परंतु, उत्तर प्रदेशात मात्र, त्याच्या विरोधात एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात खुनापासून खंडणीपर्यंतचे सगळे गुन्हे आणि कलमे आहेत. उत्तर प्रदेश पोलीसांनी आजपर्यंत पंजाब पोलीसांकडे आठ वेळा मुख्तार अन्सारीचा ताबा मागितला होता. त्यासाठी उत्तर प्रदेशातले पोलीस कित्येक वेळा रोपड जेलमध्ये जाऊनही आले होते. पण प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून जेल प्रशासनाने त्यांना मोकळेच परत पाठविले.

अनेकदा मुख्तारच्या तब्येतीची कारणे सांगितली गेली. तब्येत नाजूक असल्याने मुख्तार प्रवास करू शकत नाही, असा दावा पंजाबच्या पोलिसांनी आणि जेल प्रशासनाने सुप्रिम कोर्टातही केला होता. पण कोर्टाने तो फेटाळून लावला.

मुख्तारला यूपीची भीती का वाटते…

फार जुन्या काळात नाही, फक्त ५ – १० वर्षांपूर्वीच मुख्तारचा उत्तर प्रदेशात बोलबाला होता. तो आमदार होता. बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, समाजवादी पक्ष या सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी त्याचे आजही जवळचे संबंध आहेत. तरीही मुख्तारला सध्या पंजाबमध्ये सुरक्षित वाटत आहे. उत्तर प्रदेशातील जेलमध्ये येण्याचे तो टाळतो आहे… पण काय असावे, याला…

मुख्तारला आपल्या एन्काउंटरची भीती वाटतेय. विकास दुबेपासून अनेक गँगस्टरचा योगी सरकारच्या काळात एन्काउंटर झाला. योगी सरकारने अनेक गँगस्टर नेत्यांच्या घरादारावर बुलडोझर चालविला. यात मुख्तारचा आणि त्याच्या गँगमधल्या गँगस्टर्सचाही समावेश आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात एकेकाळी दबदबा निर्माण करणारा मुख्तार अन्सारी राज्यात यायला घाबरतोय, असे बोलले जात आहे.

पण आता सुप्रिम कोर्टाने त्याला उत्तर प्रदेशात येण्याचे टाळायचे संरक्षण काढून टाकले आहे. दोन आठवड्यांच्या आत उत्तर प्रदेशात आणल्यानंतर मुख्तारला कोणत्या जेलमध्ये ठेवायचे याचा निर्णय प्रयागराजचे कोर्ट घेईल. त्याच्यावर १५ गंभीर गुन्ह्यांसाठी खटले चालविले जातील.

Gangster Mukhtar Ansari must Be Transfered To Uttar Pradesh Jail From Punjab, orders supreme court

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*