Shameful: Despite the horrific Naxal attack in the state, CM Baghel is busy with election campaign

लाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल

CM Baghel : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा विजापूर येथे शनिवारी सायंकाळी नक्षलवाद्यांनी 700 हून अधिक जवानांना घेरून हल्ला केला. नक्षलवादी आणि सुरक्षा दलातील चकमकीत 22 जवान शहीद झाले. अनेक जवान अद्यापही बेपत्ता आहेत. सध्या राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आसाम विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गेले आहेत. आसाममध्ये प्रचार केल्यानंतर ते रविवारी संध्याकाळपर्यंत राज्यात परत येतील. दुसरीकडे, आसाममध्ये प्रचारासाठी गेलेले गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत. आसाममध्ये यावरून मुख्यमंत्री बघेल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. Shameful: Despite the horrific Naxal attack in the state, CM Baghel is busy with election campaign


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा विजापूर येथे शनिवारी सायंकाळी नक्षलवाद्यांनी 700 हून अधिक जवानांना घेरून हल्ला केला. नक्षलवादी आणि सुरक्षा दलातील चकमकीत 22 जवान शहीद झाले. अनेक जवान अद्यापही बेपत्ता आहेत. सध्या राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आसाम विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गेले आहेत. आसाममध्ये प्रचार केल्यानंतर ते रविवारी संध्याकाळपर्यंत राज्यात परत येतील. दुसरीकडे, आसाममध्ये प्रचारासाठी गेलेले गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत. आसाममध्ये यावरून मुख्यमंत्री बघेल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

आसाममधील भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा आसामच्या प्रचारासाठी गेले होते, परंतु छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यामुळे त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचे अनेक कार्यक्रम रद्द केले. रविवारी आसाममध्ये झालेल्या तीन सभांना संबोधित करत अमित शाह दिल्लीला परतत आहेत. उर्वरित दोन सभा त्यांनी रद्द केल्या.

आसाममधील मंगळदोईचे भाजप खासदार दिलीप सैकिया यांनी आसाममध्ये प्रचार सुरूच ठेवण्यावरून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, त्यांच्या राज्यात मोठा हल्ला झालेला असतानाही, कॉंग्रेस नेते आणि छत्तीसगडचे सीएम बघेल येथे निवडणूक प्रचारातच मश्गुल आहेत. अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. बघेल यांना जवानांच्या जिवाची पर्वा नाही, असा आरोप सैकिया यांनी केला. छत्तीसगडप्रति असलेली आपली कर्तव्ये पार पाडण्याऐवजी ते आसाममध्ये तळ ठोकून आहेत.

Shameful: Despite the horrific Naxal attack in the state, CM Baghel is busy with election campaign

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*