Australian women’s cricket team : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत करून सलग 22 वनडे सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी, रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात त्यांच्याच देशाच्या पुरुष संघाने सलग 21 वनडे सामने जिंकलेले आहेत. असे करून महिला संघाने नवा इतिहास रचला आहे. ऑक्टोबर 2017 पासून ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकाही वनडे सामन्यात पराभव झाला नाही. Australian women’s cricket team made history by winning 22 ODIs in a row
विशेष प्रतिनिधी
सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत करून सलग 22 वनडे सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी, रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात त्यांच्याच देशाच्या पुरुष संघाने सलग 21 वनडे सामने जिंकलेले आहेत. असे करून महिला संघाने नवा इतिहास रचला आहे. ऑक्टोबर 2017 पासून ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकाही वनडे सामन्यात पराभव झाला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 2003 मध्ये केलेल्या त्यांच्याच देशातील पुरुष संघाचा सलग 21 आंतरराष्ट्रीय वनडे जिंकण्याचा विक्रम मोडला आहे.
𝟮𝟮 𝗻𝗼𝘁 𝗼𝘂𝘁 🌟 Celebrating the @AusWomenCricket team's historic feat. — ICC (@ICC) April 4, 2021
𝟮𝟮 𝗻𝗼𝘁 𝗼𝘂𝘁 🌟
Celebrating the @AusWomenCricket team's historic feat.
— ICC (@ICC) April 4, 2021
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मेग लेनिंगने तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडला 212 धावांवर गुंडाळले. सामन्यातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत मेगन शुटेने चार गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने यानंतर एलिसा हीली (65), एलिस पॅरी (नाबाद 56) आणि एशलेग गार्डनर (नाबाद 53) यांच्या अर्धशतकांच्या बळावर 69 चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा महिला संघ सध्याचा विश्वविजेता संघ आहे.
Australian women’s cricket team made history by winning 22 ODIs in a row
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App