महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश

CM Shivraj Singh Chauhan orders sealing of state borders due to corona eruption in Maharashtra and chhattisgarh

CM Shivraj Singh Chauhan : कोरोनाचा वाढलेला उद्रेक लक्षात घेता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, आपल्या शेजारील राज्यांमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र आणि छत्तीसगडची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. CM Shivraj Singh Chauhan orders sealing of state borders due to corona eruption in Maharashtra and chhattisgarh


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : कोरोनाचा वाढलेला उद्रेक लक्षात घेता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, आपल्या शेजारील राज्यांमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र आणि छत्तीसगडची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रालगतच्या जिल्ह्यांमधील कोरोनाचे वाढलेले संक्रमण लक्षात घेता आता फक्त मालवाहू वाहने, अत्यावश्यक सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत परवानगी देण्यात येणार आहे. शिवराजसिंह चौहान यांनी कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर म्हटले की, राज्यातील सर्व जनतेने मासक घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

शिवराजसिंह चौहान म्हणाले की, स्वतः मास्क घालण्याबरोबरच इतरांनाही प्रेरित करणे आवश्यक आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणेदेखील महत्त्वाचे आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर ते लॉकडाउनचा निर्णय घेऊ शकतात. रविवारपासून कोणत्याही जिल्ह्यात लॉकडाउन लागू शकते.

CM Shivraj Singh Chauhan orders sealing of state borders due to corona eruption in Maharashtra and chhattisgarh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती