वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे, असे आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही पाहिजे तिथे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. Support the two-day lockdown decision, but pay attention to health facilities: Devendra Fadnavis
राज्यात रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण आहे. यावरही सरकारने लक्ष द्यावे. लॉकडाऊनमध्ये सामान्यांचे खूप हाल होणार आहेत. त्यामुळे सरकारने तरतूद करावी, यासाठी बैठक घ्यावी, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठीही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन केलं. मधल्या काळात सरकार गाफिल राहिल्याने ही वेळ आली असल्याची टीकाही फडवणीस यांनी केली.
BJP supports govt's decision to impose lockdown. People should abide by restrictions & follow COVID protocols. To ensure maximum vaccination, BJP workers would help people register and reach vaccination centers: Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/VL4V3OySLN — ANI (@ANI) April 4, 2021
BJP supports govt's decision to impose lockdown. People should abide by restrictions & follow COVID protocols. To ensure maximum vaccination, BJP workers would help people register and reach vaccination centers: Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/VL4V3OySLN
— ANI (@ANI) April 4, 2021
राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचाही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्राने राज्याला भरपूर मदत केली असून मी यापूर्वीच त्याची सविस्तर माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App