विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मागच्या वर्षी आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सूत्र सांभाळत श्रेयसने संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते . परंतु यंदा दुखापतीमुळे श्रेयस आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे रिषभ पंतला दिल्लीचे कर्णधारपद देण्यात आले आहे. IPL 2021: Shreyas Iyer to get entire salary despite missing the whole season
श्रेयस जरी आयपीएलमधून बाहेर झाला असला; तरी देखील त्याला दिल्ली संघाकडून बीसीसीआयच्या नियमांनुसार ‘ खेळाडू विमा योजने’ अंतर्गत 7 कोटी रुपये मिळणार आहेत.
इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यानंतर श्रेयसला मैदानाबाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यामुळे दिल्ली संघासमोर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला होता की, श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी कोण पार पाडणार?.
या पदासाठी दिल्ली संघात अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि आर अश्विन सारखे दिग्गज खेळाडू असताना देखील, दिल्ली संघाने रिषभ पंतवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की तो ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतो?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App