कठोर निर्बंध आवश्यक, जनतेने सहकार्य करावे; फडणवीसांचे आवाहन; लसीकरण मोहिमेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणार


वृत्तसंस्था

मुंबई – राज्यात कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनसह सरकारने केलेल्या सर्व उपाययोजनांना भाजपने पाठिंबा दिला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. BJP to support thackery – pawar govt decision of weekend lockdown

राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, की राज्य सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार – रविवारी संपूर्ण लॉकडाउन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध असे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. आम्ही जनतेला आवाहन करतो, की या संपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत जनतेने सहकार्य करावे.भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही आवाहन केले आहे, की आताची कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल, त्या दृष्टीने लसीकरण मोहीमेत भाजपाचे कार्यकर्ते सक्रीयतेने सहभागी होतील. हा देखील निर्णय आम्ही घेतला आहे.

कोरोनाची परिस्थिती ही महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. माझ्या माहिती प्रमाणे आज जवळजवळ ५७ हजार केसेस कोरोनाच्या महाराष्ट्रात आहेत आणि मोठ्याप्रमाणात मृत्यूसंख्या देखील वाढते आहे. कोरोनाचं पुन्हा थैमान हे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशापरिस्थितीत ज्या काही उपाययोजना सरकारच्यावतीने केल्या जातील, त्या उपाययोजनांना सहकार्य करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे आम्ही समजतो.” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

BJP to support thackery – pawar govt decision of weekend lockdown


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात