सुरत केमिकल प्लांटमध्ये 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; स्फोटानंतर लागलेल्या आगीत 27 जखमी; 8 जण गंभीर

Surat chemical plant

वृत्तसंस्था

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये बुधवारी एका रासायनिक कारखान्याच्या स्टोअरेज टँकमध्ये स्फोट झाला. ज्यामध्ये 27 कर्मचारी जखमी झाले. 7 बेपत्ता असल्याची नोंद आहे.7 employees die in Surat chemical plant; 27 injured in fire after explosion; 8 people are critical

गुरुवारी सकाळी सहा मृतदेह सापडले, तर एक कर्मचारी बेपत्ता होता. नंतर आणखी एक मृतदेह सापडला. उर्वरित 20 कर्मचाऱ्यांपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.



सुरत अग्निशमन दलाचे अधिकारी बसंत पारीख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन इंडस्ट्रियल एरियामध्ये असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत पहाटे दोनच्या सुमारास एका मोठ्या टाकीत ठेवलेल्या केमिकलची गळती झाली. त्यामुळे स्फोटानंतर आग लागली.

स्फोटामुळे कारखान्याच्या तीन मजली इमारतीला आग लागली आणि संपूर्ण युनिट जळून खाक झाले. सुमारे 9 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

कर्मचार्‍याने सांगितली आपबीती…

वाचलेल्यांपैकी अर्जुन यादव म्हणाला, मी नेहमीप्रमाणे रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होतो. तेव्हा स्फोट झाला. आम्ही जीव वाचवण्यासाठी पळत सुटलो, पण मला केमिकल स्टोअरेज टाकीजवळ आरडाओरड ऐकू आली.

सुरतमध्ये टँकरमधून गॅस गळती , ४ कामगारांचा मृत्यू ; २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

मी मागे वळून पाहिलं तर ज्वाळा उंचच उंच होत होत्या. मी पटकन बाहेर पडण्यात यशस्वी झालो.

कारखान्यात फिनाईल आणि रसायने तयार होतात

अश्विन देसाई यांच्या मालकीची इथर इंडस्ट्रीज लिमिटेड मेथॉक्सायथिल फिनाईल, मिथाइलबेन्झॉयल क्लोराईड (MMBC), थायोफेन-2-इथानॉल (T2E) सारखी रसायने तयार करते.

याशिवाय, कंपनी ऑर्थो टॉलील बेंझो नायट्रिल (OTBN), N-Octyl-D-Glucamine, Delta-Valerolactone आणि Bifenthrin अल्कोहोल तयार करणारा भारतातील एकमेव रासायनिक कारखाना आहे.

7 employees die in Surat chemical plant; 27 injured in fire after explosion; 8 people are critical

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात