Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा

Rajasthan Exit Poll

विशेष प्रतिनिधी

जोधपूर : Rajasthan Exit Poll : राजस्थान विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. अनेक सर्व्हे एजन्सीजनी एक्झिट पोल सादर केला. याद्वारे निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधण्यात आला आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 100 जागा जिंकून राजस्थानमध्ये सरकार स्थापन केले होते. तर भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी 199 जागांसाठी मतदान झाले होते. 3 डिसेंबर रोजी 1863 उमेदवारांचे भवितव्य जाहीर होणार आहे. Rajasthan Exit Poll BJP rule in Rajasthan, Congress disappointed in almost all polls

200 जागांच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत 199 जागांवर मतदान झाले. निवडणुकीपूर्वी करणपूरचे आमदार आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुरदीप सिंग कुन्नर यांचे निधन झाले होते, त्यामुळे या जागेवरील मतदान रद्द करण्यात आले होते. या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

सेमी फायनलच्या एक्झिट पोल मध्ये जर “ऍडव्हान्टेज” भाजप, तर फायनल मध्ये लढायची तरी होईल का काँग्रेसची शामत??

रिपब्लिक-मॅट्रिक्स – भाजपला 115-130 जागा मिळण्याची अपेक्षा

रिपब्लिक-मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला 65-75 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. भाजपला 115-130 आणि इतरांना 12-19 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एबीपी सी व्होटर – भाजपच आघाडीवर

राजस्थानमध्ये एबीपी सी व्होटर सर्व्हेमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 71 ते 91 जागा मिळत आहेत.
भाजप- 94-114
काँग्रेस- 71-91
इतर- 9-19

इंडिया टीव्ही – राजस्थानमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये भाजपला 80 ते 90 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचवेळी काँग्रेसला 90 ते 104 जागा मिळतील असे दिसते.
भाजप 80-90
काँग्रेस 90-104
इतर 14-18

इंडिया टुडे सर्वेक्षण- काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत

इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या वृत्तानुसार, राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत अपेक्षित आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 100 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसला 86 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपा 80-100
काँग्रेस 86-106
इतर- 9-18

पी-मार्क सर्व्हे – गेहलोत सरकारला ‘गुड बाय’

P-MARQ एक्झिट पोलनुसार, राजस्थानमध्ये भाजपला 105 ते 125 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजप- 105-125
काँग्रेस- 69-91
इतर-5-15

न्यूज 24 टुडे-चाणक्यचे सर्वेक्षण – गेहलोत सरकारची राजवट

न्यूज 24 टुडे-चाणक्यनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला 101 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 89 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काँग्रेस-101
भाजप-89
इतर-9

टाइम्स नाऊ-ईटीजी सर्व्हे – राजस्थानमध्ये भाजपचे पूर्ण बहुमत

टाईम्स नाऊ- ईटीजीनुसार, भाजप राजस्थानमध्ये पूर्ण बहुमताने सरकार बनवत आहे. भाजपला 108 ते 128 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसला 56 ते 72 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजप-108-128
काँग्रेस- 56-72
इतर- 13-21

TV9 पोलस्ट्रॅट – काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची स्पर्धा

TV9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार आहे. राज्यात भाजपला 100 ते 110 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजप- 100-110
काँग्रेस- 90-100
इतर- 5-15

जन की बात – भाजपचे पूर्ण बहुमताने सरकार

जन की बात एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी राज्यात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे.
भाजप- 100-122
काँग्रेस- 62-85
इतर- 14-15

Rajasthan Exit Poll BJP rule in Rajasthan, Congress disappointed in almost all polls

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात