प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!

prakash ambedkar rohit pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण या वादामध्ये समोरासमोर लढताहेत, ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ!!, पण प्रकाश आंबेडकर आणि रोहित पवार मात्र एकच भाषा वापरत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा साधत आहेत. आंबेडकर आणि रोहित पवारांनी अदृश्य शक्तीचाच आपल्या भाषेत प्रयोग केला आहे!!Prakash ambedkar ambedkar and rohit pawar use same language for targeting devendra fadnavis over reservation issues

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या बीड मधल्या जाळपोळीत अदृश्य शक्तीचा हात आहे असा आरोप रोहित पवारांनी केला, तर प्रकाश आंबेडकरांनी देखील अशीच अदृश्य शक्तीची भाषा वापरत मराठा विरुद्ध ओबीसी लढवण्याचे काम चालू आहे, असा आरोप केला.



मराठा आरक्षण ओबीसी मधूनच घेण्याचा मनोज जरांगे पाटलांचा निर्धार ते नेहमीच बोलून दाखवतात, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असा निर्धार छगन भुजबळ बोलून दाखवतात. हे दोन्हीही नेते एकमेकांविरुद्ध समोरासमोरून लढतात, पण अशा प्रत्यक्ष लढ्यात समोरासमोरून उतरायची तयारी नसलेले नेते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेचक-वेधकपणे टार्गेट करण्यासाठी “मागून” लढतात. प्रकाश आंबेडकर आणि रोहित पवारही त्याचीच उदाहरणे आहेत.

संविधान रॅलीत पवार नाहीत; 25 नोव्हेंबरला राहुल गांधी – उद्धव ठाकरे – प्रकाश आंबेडकर शिवाजी पार्क एकत्र??

मनोज जरंगे पाटलांच्या समर्थक मराठा आरक्षण आंदोलकांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये राजकीय पुढार्‍यांना गावबंदी केली, पण त्यातून शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते चतुराईने वगळले. ही चतुराई उघड्यावर येऊ नये म्हणून रोहित पवारांनी आपली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती गुंडाळून ठेवली होती, पण नंतर ती सुरू केली. तिला अपेक्षित असा महाराष्ट्रव्यापी प्रतिसाद मिळतोय असे चित्र नाही, पण ज्या गावात राजकीय पुढार्‍यांना गावबंदी आहे अशा गावांमध्ये रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या स्वागताचे बोर्ड जरांगे पाटलांच्या बोर्डाच्या शेजारी लागलेले दिसले.

दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी स्वतःला ओबीसी आरक्षणाचे जनक म्हणवून घेत छगन भुजबळांना आपणच तुरुंगातून सोडवले असाही दावा त्यांनी काल केला. आपण त्या न्यायाधीशाविरुद्ध आरडाओरडा केला नसता, तर छगन भुजबळ तुरुंगातून सुटले नसते, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी काल पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केला आणि आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांना झुंजवण्याचे काम “अदृश्य शक्ती” करत आहे असा आरोप केला.

यातून रोहित पवार आणि प्रकाश आंबेडकरांची एकच भाषा आणि एकच टार्गेट दिसले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस!! यापलीकडे “मागून” लढणाऱ्या नेत्यांना दुसरे काही दिसत नाही, हेच रोहित पवार आणि आंबेडकरांच्या वक्तव्यातून उघड्यावर आले.

Prakash ambedkar ambedkar and rohit pawar use same language for targeting devendra fadnavis over reservation issues

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात