सेमी फायनलच्या एक्झिट पोल मध्ये जर “ऍडव्हान्टेज” भाजप, तर फायनल मध्ये लढायची तरी होईल का काँग्रेसची शामत??

एक्झिट पोल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मणिपूर या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे बाहेर आले आहेत. हे आकडे जरी भिन्नभिन्न असले तरी त्यातला लसावि म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक किंवा कॉमन फॅक्टर काढला, तर त्यात या सेमी फायनल निवडणुकांमध्ये “ऍडव्हान्टेज” भाजप दिसतो आहे.BJP has “advantage” in exit poll of semi-final, will Congress win even if it has to fight in final??

कारण किमान दोन एक्झिट पोल मध्ये तरी मध्य प्रदेश मध्ये भाजप सत्तेवर परतताना दिसतो आहे. सर्व एक्झिट पोल मध्ये राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तन दिसते आहे, छत्तीसगडमध्ये काट्याची टक्कर दिसते आहे, तर तेलंगणा भाजपचा चंचू प्रवेश होतो आहे. याचा अर्थ एडवांटेज भाजप असाच आहे, तो देखील सेमी फायनल निवडणुकांमध्ये!!अशा स्थितीत फायनल निवडणुकांमध्ये काँग्रेसची लढण्याची शामत तरी उरेल का??, हा सवाल विचारायची वेळ आली आहे.

कारण 2018 मध्ये झालेल्या याच 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात भाजपने सत्ता गमावली होती. तेलंगणात सत्ता येण्याचा प्रश्नच नव्हता. यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान काँग्रेसने कमबॅक केले होते. ती 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल निवडणूक ठरली होती. त्यामुळे काँग्रेसने तिथे कमबॅक केले. याचा अर्थ काँग्रेसला या निवडणुकांमधून बूस्टर डोस मिळून 2019 ची फायनल म्हणजे लोकसभा निवडणूक जबरदस्त होणार असा होरा आणि अटकळी त्यावेळी माध्यमांनी बांधल्या होत्या. काँग्रेसमध्ये देखील त्यावेळी जोश भरला गेला होता. पण त्यानंतरच्या म्हणजे 2018 डिसेंबर नंतरच्या अवघ्या 4 महिन्यांमध्ये देशातले वातावरण पूर्ण फिरले होते आणि त्यावेळी मोदी सरकार 2014 पेक्षा जास्त बहुमत मिळवून 2019 मध्ये सत्तेवर आले होते.

या राजकीय पार्श्वभूमीवर आज 30 नोव्हेंबर 2023 रोजी आलेले एक्झिट पोलचे आकडे पाहता एडवांटेज भाजपा आहे. मध्य प्रदेश, राजस्थानात भाजप सत्तेवर परततो आहे, तर छत्तीसगडमध्ये काट्याची टक्कर आहे. तेलंगणात जिथे भाजपचा फक्त 1 आमदार होता, तिथे भाजप आपली संख्या वाढवतो आहे या सर्वांचा राजकीय अर्थ असा की सेमी फायनल निवडणुकांमध्ये भाजपला दोन राज्यांमध्ये पूर्ण सत्ता एका राज्यांमध्ये छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये सत्ता मिळण्याची शक्यता किंवा आमदारांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आणि तेलंगणात चंचु प्रवेश!!

पण याचा दुसरा अर्थ अधिक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सेमी फायनल निवडणुकांमध्ये काँग्रेसची पीछेहाट. अशा स्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये म्हणजे फायनल निवडणुकांमध्ये काँग्रेस कोणते मनोबल घेऊन निवडणुकांमध्ये उतरणार?? हा कळीचा सवाल आहे. 2018 मध्ये काँग्रेसला 3 राज्यांच्या सत्तेचा बूस्टर डोस मिळाला होता. पण या बूस्टर डोसा 2019 च्या फायनल निवडणुकीत परिणाम दिसला नव्हता. जो परिणाम दिसला तो उलटाच झाला होता, मग 2023 चा काँग्रेसला बूस्टर डोसच मिळालेला नाही, तर 2024 मध्ये काँग्रेसचे काय होणार?? त्याहीपेक्षा महत्त्वाचा सवाल आहे.

BJP has “advantage” in exit poll of semi-final, will Congress win even if it has to fight in final??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात