म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले

Mizoram
  • काही दिवस तेथे राहण्याचा त्यांचा इरादा होता, कारण…

विशेष प्रतिनिधी

इम्फाळ : चीन राज्यातील लोकशाही समर्थक शक्तींनी लष्करी छावण्या ताब्यात घेतल्यानंतर मिझोरामला पळून आलेल्या म्यानमारच्या आणखी तीस सैनिकांना बुधवारी मणिपूरच्या मोरेह सीमेवरून मायदेशी पाठवण्यात आले.Another 30 soldiers who fled from Myanmar to Mizoram were repatriated



अधिका-यांनी सांगितले की, एका अधिकाऱ्यासह म्यानमार लष्कराचे ३० सैनिक मंगळवारी मिझोरामच्या सियाहा जिल्ह्यातील तुईपांग गावात पळून आले होते आणि काही दिवस तेथे राहण्याचा त्यांचा इरादा होता. कारण लोकशाही समर्थक सशस्त्र दलांनी चीन राज्यातील मोटुपी येथील त्यांच्या छावण्यांवर हल्ला केला आणि ताबा मिळवला होता.

म्यानमारमधून येणाऱ्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स घेणार सरकार, मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

“बुधवारी दुपारी, दोन भारतीय हवाई दल (IAF) हेलिकॉप्टरने 30 सैनिकांना मिझोरामच्या सियाहा जिल्ह्यातून मणिपूरच्या मोरेह शहरात नेले, जिथे त्यांना म्यानमारच्या लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले,” असे या प्रक्रियेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले.

ते म्हणाले की, बायोमेट्रिक प्रक्रियेसह आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, भारतीय अधिकाऱ्यांनी 30 सैनिकांना शेजारच्या म्यानमारमधील तामू (मोरेह सीमेच्या समोर) लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

Another 30 soldiers who fled from Myanmar to Mizoram were repatriated

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात