उत्तर प्रदेशमध्ये ५०० महिलांनी केले ऐतिहासिक कावड यात्रेचे नेतृत्व!


पाणी पिण्यासाठीही न थांबलेल्या भाविकांच्या उत्साहासमोर उन्हाचा कडाकाही फिका पडला.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ  : पिवळा आणि लाल पोशाख परिधान केलेल्या महिला भाविकांनी रविवारी उत्तर प्रदेशातील पहिली महिला कावंड यात्रा काढली. ५०० पेक्षा अधिक महिला हर हर महादेवचा जयघोष करत, पवित्र गंगजलासह बांबूचा खांब खांद्यावर घेऊन जवळपास तीन किलोमीटर चालल्या. 500 women led historic Kavad Yatra in Uttar Pradesh

शहरात यात्रेचे आयोजन करणाऱ्या विश्वमंगला समितीतर्फे भाविकांमध्ये गंगाजलाचे वाटप करण्यात आले. पाणी पिण्यासाठीही न थांबलेल्या भाविकांच्या उत्साहासमोर उष्माघात कमी पडला.

मनकामेश्वर मंदिर, डालीगंज येथून सुरुवात करून बहुतेक महिला उन्हात आणि अनवाणी पायी चालत, हसनगंजच्या खाटू श्याम मंदिरात, त्यांची मुले सोबत घेऊन  पोहचल्या. तसेच, भगवे ध्वज हाती धरून, भगवान शिव, भगवान गणेश आणि देवी पार्वतीची वेषभूषा केलेल्या मुलांसह शिवभक्त रथाच्या मागे चालत गेले. खांब वाहून नेणाऱ्या महिलांनी त्यांना रंगीबेरंगी धागे आणि कपड्यांनी सजवले आणि ते शेअर केले जेणेकरून प्रत्येकाला त्यात सहभागी झाल्यासारखे वाटावे.

यात्रेच्या निमंत्रक प्रियांका शुक्ला म्हणाल्या, “श्रावण महिन्याचे औचित्य साधून शहरातील महिलांनी एकत्र येऊन राज्यातील पहिली महिला कावड यात्रा काढली. या मोठ्या प्रतिसादामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. आमची समिती इतर शहरांमध्येही यात्रेचे आयोजन करणार आहे.”

500 women led historic Kavad Yatra in Uttar Pradesh

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*