मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर शिवसेनेची एकनाथ शिंदेंविरोधात सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हटविले!!


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एकच दिवस उलटल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरुन हटवले आहे. शिवसेनेने याबाबतचे पत्र काढले आहे. या कारवाईमुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद चिघळण्याची शक्यता आहे.Shiv Sena’s biggest action against Eknath Shinde after taking oath as Chief Minister; Removed from leadership !!

शिवसेनेत शिवसेनाप्रमुख पदानंतर नेतेपद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. यावरुनच ते पद किती महत्त्वाचं हे लक्षात येतं. तसंच त्या ठाकरे यांनी याच पदावरुन एकनाथ शिंदे यांना हटवले आहे.  एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आल्याचं पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रावर उद्धव ठाकरे यांची सही आहे. या कारवाईच्या पत्राची प्रत ही एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या राहत्या घरीही पाठवण्यात आली आहे. याआधी शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरुनही हटवण्यात आलं होतं.



शिंदेंनी बंडखोरी करत शिवसेनेच्या गोटातील 39 आमदारांना आपल्यासोबत घेतलं. त्यानंतर सूरत, गुवाहाटी आणि गोव्याला गेले. त्यानंतर आमदारांचं समर्थन मिळवत भाजपसोबत जात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेने ही मोठी कारवाई केली आहे.

मात्र आता या प्रकरणी शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना कोणतेही उत्तर न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Shiv Sena’s biggest action against Eknath Shinde after taking oath as Chief Minister; Removed from leadership !!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात