सरपंच निवडणुकीतील वादातून सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार


सरपंच निवडणुकीतील वादातून मित्रासह कारमधून घराकडे जात असलेल्या सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. पुण्यातील शिवणे येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.Sarpanch election controversy, firing on criminal in the streets


विशेष प्रतिनिधी

पुणे : सरपंच निवडणुकीतील वादातून मित्रासह कारमधून घराकडे जात असलेल्या सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. पुण्यातील शिवणे येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

केदार शहाजी भालशंकर (वय २४) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या पाठीला गोळी लागली आहे. याप्रकरणी निलेश गायकवाड याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार हा त्याचा मित्र आकाश शिंदे याच्यासह घरी येत होता.



शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच लोकांना धाक दाखवीत घाबरवून पळवून लावले. केदार याच्यावर मांडवी खुर्द गावची सरपंच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी धमकवल्याचा गुन्हा दाखल आहे.

Sarpanch election controversy, firing on criminal in the streets

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात