पर्यटनासाठी जंगलात गेलेल्या तरुणांना लुटले; बुलढाणा जिल्ह्यात १२ तासांत आरोपी जेरबंद


वृत्तसंस्था

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा येथील अजिंठा पर्वत रांगेतील जंगलात पर्यटनासाठी गेलेल्या महाविद्यायालायीन विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील मोबाइल व नगदी रक्कम हिसकावून चार अज्ञात युवकांनी पोबरा केला. Robbed young people who went to the forest for tourism; Accused arrested in Buldhana district within 12 hours
पीडित विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली होती, यामध्ये जणांवर गुन्हा दाखल केला. ठाणेदार सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात 12 तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.



गिरडा हे निसर्गरम्य स्थान

गिरडा हे निसर्गरम्य स्थान असून या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनासाठी येतात. बुलढाणा आयुर्वेदिक महाविद्यालयचे काही विद्यार्थी पर्यटनासाठी गेले होते. त्यापैकी चार विद्यार्थी फिरत फिरत पुढे गेले. तिथे अज्ञात ४ युवक त्या ठिकाणी पोचले व त्यांनी मारहाण केली. रोख ७५० रुपये व ४ मोबाइल किंमत ४५ हजार ५०० रुपये असा एकूण ४६ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाले होते.

भूषण रमेश राठोड याने ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. पोलिसाने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ठाणेदार सारंग नवलकार यांनी एक पथक नेमून आरोपींच्या शोधकार्यासाठी रात्रीच पथकाला रवाना केले. या दरोड्याच्या गुन्ह्यात सामील आरोपी समीर जलाल बागुल (वय २० ),आमिर शेख खाबरडे (वय २२), सुलतान दिलवार बरडे ( वय २४) तिन्ही रा. मढ ता.जि.बुलढाणा, मजीद जुम्मा तडवी (वय २८ ) रा जांभुळ ता. जामनेर जि.जळगांव यांना ताब्यात घेतले. या ४ आरोपींकडून सदर घटनेतील 4४मोबाईल खरेदी करणाऱ्या अफसर अकबर तडवी ( वय २७) रा. शिवनगर, पहुर पेठ ता. जामनेर जि.जळगाव असे ५ आरोपींना १२ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली. न्यायालयाने त्यांना १७ जुलै पर्यंत त्यांना पोलिस कोठडी दिली.

Robbed young people who went to the forest for tourism; Accused arrested in Buldhana district within 12 hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात