रिक्षाचालकाकडून पुण्यात पाेलीस शिपाईला बेदम मारहाण


काेंढवा परिसरात खडी मशीन चाैक येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पाेलीस शिपायाने भरधाव वेगात चाैकात थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करुन विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यावरुन रिक्षाचालकाने पाेलीस शिपायासाेबत वाद घालून साथीदारांसह त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. 


विशेष प्रतिनिधी 

पुणे -पुण्यातील काेंढवा परिसरात खडी मशीन चाैक येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पाेलीस शिपायाने भरधाव वेगात चाैकात थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करुन विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यावरुन रिक्षाचालकाने पाेलीस शिपायासाेबत वाद घालून साथीदारांसह त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.  Riksha Driver & her friends beaten the traffic police in kondhva area

याप्रकरणी अनिल हनुमंत कचरे या पाेलीस शिपायाने काेंढवा पाेलीस चाैकीत रिक्षाचालक ज्ञानेश्वर अशाेक ढवरे (वय-२१), सिध्देश्वर अशाेक ढवरे (३१), सविता अशाेक ढावरे (६०) व एक अनाेळखी इसम यांचे विराेधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाेलीसांनी रिक्षाचालक ज्ञानेश्वर ढवरे, सिध्देश्वर ढवरे या आराेपींना अटक केले आहे.

पाेलीस शिपाई अनिल कचरे हे खडी मशीन चाैकात वाहतुकीचे नियमन करत हाेते. त्यावेळी रिक्षाचालक ज्ञानेश्वर ढवरे हा वेगाने इतर थांबवलेल्या वाहनांना ओव्हरटेक करुन विरुध्द दिशेने रिक्षा चालवून वाहतुकीस अडथळा आणत हाेता. त्यामुळे चाैकातील वाहतुक माेठया प्रमाणात खाेळंबल्याने त्यास पाेलीस शिपाई अनिल कचरे यांनी रिक्षा बाजुस घेण्याची विनंती केली. मात्र, रिक्षाचालकाने पाेलीस कर्मचाऱ्या साेबत वाद घालून त्यांचे युनिफाॅर्मची काॅलर पकडून तेथुन निघून गेला.

सेच पुन्हा दुपारी त्याठिकाणी साथीदारांसाेबत येऊन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन पाेलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन त्यांचे अंगावर धावुन जाऊन त्यांना दाेन वेळा गालत चापट मारुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी काेंढवा पाेलीस पुढील तपास करत आहे.

Riksha Driver & her friends beaten the traffic police in kondhva area

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात