नाशिक : साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!गोदाकाठी माय मराठी…


नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे.गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. Nashik : Consideration of names of veterans for inauguration of Sahitya Sammelan; Curiosity shigela! Godakathi My Marathi


विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य समंलेनाची तयारी अतिशय उत्साहात आणि जोरात सुरू आहे. पालकमंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते सोमवारी संमेलन गीताचे अनावरण करण्यात आले.गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे.नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे.

हे आहेत गिताचे बोल

अनंत आमुची ध्येयासक्ती
अक्षरशक्ती अक्षरभक्ती
गोदाकाठी मायमराठी
ग्यानपर्वणी साहित्याची
आली गोदाकाठी
अभिमानाने गर्जा आता
जय जय माय मराठी

अनावरणानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या गीताचे तोंडभरून कौतुक केले. गीतकार, संगीतकार, गायक आणि सहकाऱ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. सध्या उद्घाटकांच्या नावावर विचार सुरू असून, लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.अशी माहिती यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

दरम्यान, साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनपूर्व गुरुवारी ०२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी करण्यात आले आहे.

उदघाटनसाठी या नावांवर विचार सुरू

साहित्य संमेलनाचे उदघाटन कुणाच्या हस्ते करायचे याचा विचार सुरू आहे. गायिका आशा भोसले, गीतकार आणि कवी गुलजार यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. सोबतच महानायक अमिताभ बच्चन आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या नावांचाही विचार सुरू आहे.

Nashik : Consideration of names of veterans for inauguration of Sahitya Sammelan; Curiosity shigela! Godakathi My Marathi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात