नबाब मलिक आणि संजय राऊत ही राज्यातील सलीम – जावेदची, वैयक्तिक दुष्मनी काढताहेत


नबाब मलिक आणि संजय राऊत ही राज्यातील सलीम – जावेदची जोडी आहे. सलीम म्हणजे नवाब मलीक आणि जावेद म्हणजे संजय राऊत आहेत. आपली वैयक्तिक दुष्मनी ते काढत आहेत असा आराेप भाजपचे नेते माेहित कंबाेज यांनी केला आहे. Nabab Malik and Sanjay Raut are Salim-Javed in the state, drawing personal animosity


विशेष प्रतिनिधी

मुंबई: नबाब मलिक आणि संजय राऊत ही राज्यातील सलीम – जावेदची जोडी आहे. सलीम म्हणजे नवाब मलीक आणि जावेद म्हणजे संजय राऊत आहेत. आपली वैयक्तिक दुष्मनी ते काढत आहेत असा आराेप भाजपचे नेते माेहित कंबाेज यांनी केला आहे.

समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. यावरून मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की , यामध्ये विषय फक्त कोणाच्या बारचा परवाना रद्द करण्याचा नाही आहे, तर सत्तेत असताना सत्तेचा आणि अधिकाऱ्यांच्या दुरूपयोग करण्याचा आहे. 24 वर्षानंतर समीर वानखेडेच्या बारचा परवाना रद्द केला गेला, यामध्ये खरच वानखेडेंचा परवाना चुकीचा होता का हे येणारी वेळ ठरवेल. ज्यांनी हा परवाना रद्द केला, ते अधिकारी संजय राऊत यांचे व्याही म्हणजे संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे आहेत, कंबोज म्हणाले की, एकीकडे नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने अवमान करत असल्याप्रकरणी अनेकदा फटकारलं आहे. राज्यात सलीम – जावेदची ही जोडी आपापले पर्सनल स्कोर सेटल करण्यातच लागले आहेत. महाराष्ट्रात आता स्वत:ची वैयक्तिक दुश्मनीमध्ये बदला घेण्यासाठी सत्ता आणि अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय का?,


न्यायालयाच्या तंबीनंतरही नबाब मलिकांकडून बदनामी सुरूच, ज्ञानदेव वानखेडे यांची पुन्हा एक याचिका


बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क यांच्या वतीने या बारचा मुद्देमाल ताब्यात घेणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली.

समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढले हाेते. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस होते. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होता. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे” असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.

Nabab Malik and Sanjay Raut are Salim-Javed in the state, drawing personal animosity

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात