न्यायालयाच्या तंबीनंतरही नबाब मलिकांकडून बदनामी सुरूच, ज्ञानदेव वानखेडे यांची पुन्हा एक याचिका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : न्यायालयाने तंबी दिल्यानंतरही अल्पसंख्यांक विकास मंत्री नबाब मलिक ऐकायला तयार नाहीत. त्यांच्याकडून वानखेडे कुटुंबाची बदनामी सुरूच आहे. त्यामुळे एनसीबी मुंबईचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.Dnyandev Wankhede’s petition after defamation from Nawab Malik

वानखेडे कुटुंबीयांची बदनामी करणार नाही, असे आश्वासन देऊनही मलिक सातत्याने आमची बदनामी करत आहेत, असे वानखेडे यांनी अवमान याचिकेत म्हटले आहे. २८ डिसेंबर २०२१, २ आणि ३ जानेवारी २०२२ या तीन दिवशी मलिक यांनी उच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचा भंग केल्याचे त्यांनी म्हटले आहे.



आर्यन खान अटकेनंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना त्यांच्या कामकाजावरून लक्ष्य केले. मलिक यांनी समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पत्रकार परिषदा घेतल्या व ट्विटरवरही पोस्ट केल्या. त्याविरोधात वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात मानहानी दावा दाखल केला.

Dnyandev Wankhede’s petition after defamation from Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!