ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक; सुप्रिया सुळे – पंकजा मुंडे यांच्या नावांचे उल्लेख भोवले!!


प्रतिनिधी

सातारा : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेचे “दंडवत आणि दंडूका” आंदोलन केले. यावेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी त्यांना पिपरंद (ता. फलटण) राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना साताऱ्यात आणण्यात आले.Bandatagya karadkar arrested

आंदोलनात करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला. बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.

आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर प्रचंड गर्दी जमवली होती. त्या सर्वांनी करोना नियमांचे उल्लंघन केले यामुळे पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर, विकास शंकर जवळे, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात आणले. यावेळी आंदोलनाची आणि वक्तव्याची चौकशी करुन अटक केलि.

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावे घेतली होती. पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले?, असेही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिले होते. आपण नावे घेतली आहेत ते सिद्ध करु शकतो, असेही म्हणाले होते. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटे बोलत आहेत सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते.

वाइन विक्रीच्या निर्णयावरुन टीका

मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन केले, असे ते म्हणाले होते.

बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल.

बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पवळा बांधला असा उल्लेख केला होता. ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पवळा आणि ढवळा म्हणजे अजित पवार असे ते म्हणाले होते.

बंडातात्यांचा माफीनामा

ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकले असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचे असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही, असे बंडातात्या म्हणाले होते.

गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. आहे. तसंच राज्यभरात आंदोलनही केले. प्रक्षोभक भाषण आणि बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केलि.

Bandatagya karadkar arrested

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात