पुण्यातील येरवड्यात स्लॅबसाठी तयार लोखंडी जाळ्यांचे छत कोसळून सात जणांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे छत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या जाळ्यांखाली अडकून सात कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उर्वरित आठ जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.At least seven people have been killed after a slab roof collapsed in Pune’s Yerwada

पुणे-नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकाच्या अलीकडे वाडिया फार्मच्या जागेवर ब्ल्यू ग्रास कंस्ट्रकशनची इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या बेसमेंटचे काम आता सुरू असून, तेथे भूमिगत स्लॅब टाकण्यात येत होता. त्यासाठी आवश्यक लोखंडी छत तयार करण्याचं काम १५ कामगार करत होते.



ते प्रामुख्याने लोखंडी गजांचे वेल्डिंग करत होते. त्यावेळी हे वजनदार लोखंडी छत कोसळले. अग्निशमन दलाला याची वर्दी मिळताच दलाची टीम दुर्घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकायार्चा मार्ग खुला केला. एका मागोमाग एक त्यांनी सात जणांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी दिली.

या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, असं येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख यांनी सांगितलं आहे.

At least seven people have been killed after a slab roof collapsed in Pune’s Yerwada

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात