उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार; केंद्र आणि राज्य सरकारकडे चौकशीची मागणी


वृत्तसंस्था

मेरठ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सुरू असताना एआयएमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर दोन जणांनी गोळीबार केला आहे. मेरठ मधील किठौर येथे छिजरासी टोल नाक्यावर ओवैसी यांची गाडी उभी असताना मोटरसायकलवरून दोघे जण आले आणि त्यांनी चार गोळ्या ओवैसी यांच्या गाडीच्या दिशेने झाडल्या आणि पिस्तूल तिथेच टाकून ते पळून गेले.Asaduddin Owaisi’s car shot dead in Uttar Pradesh; Demand for Inquiry from Central and State Governments

या गोळीबारात ओवैसी सुखरूप असून ते दुसऱ्या गाडीने दिल्लीकडे रवाना झाले. ओवैसी यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून आपण सुखरूप असल्याचे म्हटले आहे.दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी या सर्व घटनेसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने याची चौकशी करावी. एका संसद सदस्याच्या गाडीवर हा गोळीबार झाला आहे.उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांनी चौकशी करून कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे. हल्लेखोर नेमके कुठून आले आणि ते कोण होते?, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. उत्तर प्रदेश पोलीस या संदर्भात तपास करत आहेत.

Asaduddin Owaisi’s car shot dead in Uttar Pradesh; Demand for Inquiry from Central and State Governments

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर