सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी; बंडातात्यांच्या मठात पोलीस!!


प्रतिनिधी

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मठात पोलीस पोहोचले आहेत. त्यांची चौकशी सुरू केली आहे. Supriya Sule, inquiry into objectionable statement against Pankaja Munde; Police in Bandatatya’s monastery !!

राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबत वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. तसंच सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाने काल दिला होता. त्यानुसार आज सकाळीच बंडातात्या कराडकर यांच्या पिंजर मठात साताऱ्याचे पोलीस पोहोचले आहेत. पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.



बंडातात्या कराडकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वाइन विक्री धोरणाविरोधात बोलताना खासदार सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर बंडातात्या यांनी माफी देखील मागितली होती.

 सर्वपक्षीय महिला नेत्या आक्रमक

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे, खासदार नवनीत राणा आदींनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. स्वतःला कीर्तनकार म्हणवतात पण स्त्रीत्वाचे असे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान खपवून घेतला जाणार नाही. बंडा तात्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा पोलिसांनी त्यांना जाब विचारावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. पोलीसांनी बंडातात्या यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

Supriya Sule, inquiry into objectionable statement against Pankaja Munde; Police in Bandatatya’s monastery !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात