मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात हाच माझा शुद्ध हेतू – छत्रपती संभाजी राजे


प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गरीब मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. छत्रपती संभाजी यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हाच माझा शुद्ध हेतू असल्याचे म्हटले आहे. तसेच उपोषण करुन मला वर जायचे आहे, असं नाही, तर मला कायम तुमच्यासोबत रहायचे आहे, असे छत्रपती यांनी सांगितले. मी मराठ्यांचा सेवक तर आहेच, पण मी बहुजन समाजाचे नेतृत्व करतो, असेही छत्रपती संभाजी म्हणाले. My pure intention is to accept the demands of the Maratha community: Chhatrapati Sambhaji Raje

माझी आमरण उपोषण करण्याची इच्छा नाही, पण माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती शाहू महाराजांंची एकच शिकवण आहे, जी माझ्या रक्तात आहे, जे माझे संस्कार आहेत. महाराजांनी नेहमी अन्यायाविरोधात लढा दिला आहे, शाहू महाराजांनीही बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपले जीवन वेचले. मी सुद्धा 2007 पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना, या गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली, जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी एस्सी, एसटी, ओबीसी समाजाला न्याय दिला होता. तसाच न्याय या गरीब मराठ्यांना मिळावा म्हणून, मी सुद्धा प्रयत्न करत आहे, असे संभाजी राजे यावेळी म्हणाले.



आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. कोणालाही सांगता येत नाही, वकिलांनाही सांगता येत नाही की पुढचे मार्ग काय असणार आहे? कधी निर्णय लागणार? त्यामुळे मी काही मोजक्या मागण्या निवडल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी आग्रही आहे. ज्या मागण्या मी निवडल्या आहेत त्या पूर्ण करणं सरकारला शक्य आहे. याआधी अशा गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या निमंत्रणावर मी जाणार आहे. मला आता त्रास होतो आहे, पण मराठा समाजासाठी हा त्रास काहीच नाही, असं म्हणत छत्रपती संभाजींनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

मी मराठा समाजाचा सेवक

सगळ्या समन्वयकांना माझी विनंती आहे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून, मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मार्ग काढावा. तिथे व्यवस्थित मागणी करावी. समाजाचे प्रश्न मार्गी लावावे, आपला मोठेपणा न करता समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रामाणिकपणे माझे मत असे आहे की, या समाजाला न्याय मिळावा. आपण स्वत:च्या मनाने येथे आलो आहोत. मराठा समाजाला वेठीस धरु नका. मला काही वर जायच नाही, मला मराठा आणि बहुजन समाजासाठी खूप काही करायच आहे, असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

My pure intention is to accept the demands of the Maratha community: Chhatrapati Sambhaji Raje

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात