सप्तपदीनंतर जिद्द, चिकाटीने एमपीएससी; दांपत्याची सरकारी सेवेचीही सहपदी!!


प्रतिनिधी

पुणे : लग्नाच्या सप्तपदी नंतर एमपीएससी उत्तीर्ण होऊन सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास 1 अधिकारी पदी निवडीचा प्रवास देखील जोडीनेच हे सहजीवनाचे आदर्श उदाहरण दिसते आहे, सार्वजनिक बांधकाम विभागात!! MPSC with tenacity, persistence after Saptapadi; The couple also holds a government service post

लग्नानंतर करिअर नाही संसार ओढावा लागतो.’ ही धारणा खोटी ठरवत सुरेश चासकर आणि सौ. मेघना चासकर या दांपत्याने एकमेकांच्या सोबतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत यशस्वी होत यश मिळवले आहे.

कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच सौ. मेघना यांनी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदव्युत्तर शिक्षण घेतले.

नोकरी आणि संसार सांभाळून या दोघांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. त्याचे फलित म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात दोघेही वर्ग – १ पदी रुजू होणार आहेत.

बहुतांश मुली लग्नानंतर शिक्षण थांबवत आपल्या स्वप्नांनाही पूर्णविराम देतात, तर लग्नानंतर आपले स्वप्न पूर्ण करायची वेळ गेली असा समज करून घेतात. अनेक मुले देखील हेच पत्करतात. या सगळ्यांसाठी सुरेश आणि सौ. मेघना चासकर अपवाद ठरले आहेत.

इच्छा, जिद्द आणि मेहनत असेल तर कोणत्याही परिस्थितीत स्वप्न पूर्ण करता येऊ शकते. लग्नाचे बंधन देखील त्याला आडवे येत नाही, हे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले आहे.

सहजीवन म्हणजे एकमेकांच्या स्वप्नांना पाठबळ देऊ कार्यासाठी प्रोत्साहन देत जीवन जगणे. एकमेकांच्या स्वप्नांना पाठबळ देताना स्वतःची स्वप्न देखील पूर्ण करण्याची ताकद ही नाती देत असते. या नात्याला आपल्या यशाची सकारात्मक पायरी बनविल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या हातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा घडो आणि विभागाची मान उंचावण्याच्या सुध्दा सत्कार्य घडो, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी चासकर दांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

MPSC with tenacity, persistence after Saptapadi; The couple also holds a government service post

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात