जसे नरसिंह रावांना मनमोहन सिंग मिळाले; तसेच मोदींना जयशंकर मिळालेत!!


विशेष प्रतिनिधी

जसे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना भारताच्या आर्थिक कसोटीच्या काळात डॉ. मनमोहन सिंग मिळाले होते, तसेच भारताला परराष्ट्र कूटनीतीच्या कसोटी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर मिळाले आहेत. The India Way : narasimha rao and Manmohan Singh brought India on economic reform’s path, modi – Jaishankar bringing india on superior world diplomatic path

येथे या दोन्ही पंतप्रधानांची अथवा त्यांच्या अनुक्रमे अर्थ आणि परराष्ट्र मंत्र्यांची तुलना अपेक्षित नाही. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळातील राजकीय धोरणाशी देखील याचा संबंध नाही, तर काळाच्या कसोटीवर उतरलेले दोन कर्तृत्ववान पंतप्रधान, त्यांनी स्वीकारलेली आव्हाने आणि त्यांना अत्यंत मोलाची साथ दिलेले दोन वरिष्ठ मंत्री यांचे को-रिलेशन मात्र नक्की आहे!!

पी. व्ही. नरसिंह राव ज्या आव्हानात्मक परिस्थितीत 1991 मध्ये भारताचे पंतप्रधान बनले, त्यावेळी भारताची आर्थिक स्थिती दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली होती. भारताला खूप मोठ्या आर्थिक सर्जरीची गरज होती, ती गरज नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या कुशल अर्थतज्ञा कडून पूर्ण करवून घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेतील नोकरशाहीचा रेड टेप काढून टाकताना अनेक अप्रिय निर्णय मनमोहन सिंग यांना घ्यावे लागले. परंतु त्यांना संपूर्ण राजकीय पाठिंबा नरसिंह राव यांनी उपलब्ध करून दिला. किंबहुना नरसिंह राव हे डॉ. मनमोहन सिंग यांच्या पाठीशी भिंतीप्रमाणे भक्कम उभे राहिले. राजकीयदृष्ट्या अनेक अपचनीय ठरणारे आणि आव्हान ठरणारे कटू निर्णय नरसिंह राव – मनमोहन सिंग जोडीला घ्यावे लागले. पण या दोन्ही नेत्यांनी माघार न घेता भारताला जागतिकीकरणाची कवाडे पूर्ण खुली करून दिली. भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून नुसती खेचून बाहेर काढली असे नाही, तर तिला आर्थिक उदारीकरणाच्या महामार्गावर आणून सोडले. किंबहुना उदारीकरणाच्या महामार्गावर भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे संपूर्ण श्रेय नरसिंह राव आणि मनमोहन सिंग याच जोडगोळीकडे जाते!!



नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या दोन्ही नेत्यांसाठी हे काम अजिबात सोपे नव्हते. काँग्रेस पक्षातंर्गत बड्या – बड्या नेत्यांची आव्हाने या दोन्ही नेत्यांपुढे होती. पण ती आव्हाने नरसिंह राव यांनी आपल्या चाणक्य बुद्धीने मोडून काढली आणि डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी खुला हात उपलब्ध करून दिला. त्यामुळे नरसिंह राव यांना भारताच्या बौद्धिक जगताने “आर्थिक सुधारणांचे भीष्म पितामह” Father of Indian economic reforms ही बिरुदावली बहाल केली आहे.

हे झाले नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांचे. या दोन्ही नेत्यांनी भारतासाठी केलेल्या आर्थिक क्षेत्रातल्या महनीय योगदानातून आज भारत बराच पुढे सरकला आहे. भारताने दीर्घ पल्ला गाठला आहे. पण आज 2023 मध्ये जेव्हा भारताकडे जी 20 अशा विकसित आणि विकसनशील देशांचे नेतृत्व आले आहे, अशावेळी भारताला परराष्ट्र धोरणातील कूटनीतीवर विशेषत्वाने भर देऊन पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर करत आहेत.

भारताची आत्ताची आव्हाने 1991 पेक्षा वेगळी आहेत. भारत आधीच आर्थिक सुधारणांच्या महामार्गावरून वेगाने वाटचाल करतो आहे. किंबहुना इतर अनेक महत्त्वाकांक्षी अर्थव्यवस्थांच्या देशांना भारताने मागे टाकले आहे. भारताची आर्थिक झेप जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत पोहोचली आहे. पण त्याच वेळी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर परराष्ट्र आणि संरक्षण धोरणा संदर्भात कूटनीतीच्या पातळीवर वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते आहे. ही आव्हाने प्रामुख्याने नॅरेटिव्हच्या पातळीवर आहेत. एकीकडे भारताची सर्वच क्षेत्रात कामगिरी उंचावत असताना दुसरीकडे भारताची प्रतिमा जास्तीत जास्त मलीन करणारा नॅरेटिव्ह सेट करणे हा काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शक्तींचा प्रयत्न आहे. अनेक टूलकीट यासाठी कार्यरत आहेत. या शक्तींनी निर्माण केलेला नकारात्मक नॅरेटिव्ह आपल्या प्रखर बौद्धिक क्षमतेने मोडून काढण्याचे काम परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर करत आहेत.

भारताच्या परराष्ट्र नीतीत गेल्या 75 वर्षांमध्ये नसलेला आक्रमक भाव एस. जयशंकर यांनी आणला आहे. भारताची परराष्ट्र नीती आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय शांततेच्या नावाखाली
बचावात्मक किंबहुना नकारात्मक राहिली. पण ही नकारात्मकता आणि बचाव भेदून केंद्रातील मोदी सरकारने परराष्ट्र नीती आणि संरक्षण नीती यांच्यातले संबंध दृढ करताना nation first “भारताचे हित” हेच केंद्रस्थानी ठेवून परराष्ट्र नीतीला आक्रमक मोहरा दिला आहे आणि हाच मोहरा म्हणजे सुब्रह्मण्यम जयशंकर हे आहेत.

आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या पातळीवर उच्च दर्जाच्या मुत्सद्देगिरीने आणि उत्तम बौद्धिक क्षमतेने जयशंकर वेगवेगळ्या भारताविषयीच्या नकारात्मक नॅरेटिव्हला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. मग मग ती संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीची बैठक असो अथवा सिंगापूर सारख्या देशात पाकिस्तान अथवा चिनी पत्रकारांनी एकत्रित रित्या केलेला भारतावरचा बौद्धिक हल्ला असो, जयशंकर हा त्यांचा बौद्धिक चक्रव्यूह उत्तम पद्धतीने भेदत आहेत. मोदी आणि जयशंकर ही जोडगोळी भारताच्या आक्रमक परराष्ट्र नीतीचा महामार्ग आखत आहेत. हे दोन्ही नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे वैशिष्ट्य आहे.

नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या जोडगोळीने भारताला आर्थिक सुधारणांचा महामार्ग खुला करून दिला, तर त्या पुढे जाऊन मोदी आणि जयशंकर ही जोडगोळी भारताच्या परराष्ट्र धोरणातील आक्रमक कूटनीतीचा महामार्ग विस्तारत आहे. The India Way भारताच्या परराष्ट्र नीतीची ही नवी सकारात्मक ओळख आहे!!

The India Way : narasimha rao and Manmohan Singh brought India on economic reform’s path, modi – Jaishankar bringing india on superior world diplomatic path

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात