भारतात जन्मलेला, भारताचे अन्न पाणी घेणारा प्रत्येकजण हिंदू, मलाही हिंदू म्हणा : आरिफ मोहम्मद खान


वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : हिंदू – हिंदुत्व या शब्दांवरून काँग्रेसचे वरिष्ठ खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान शब्दछल करत असताना केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी हिंदू शब्दाबद्दल नि:संदिग्ध विवेचन केले आहे. भारतात जन्मलेला, राहणारा भारताचे अन्न पाणी ग्रहण करणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आपण मलाही हिंदू म्हणा कारण मीही भारतात जन्माला आलो. भारतात राहतो. भारताचे अन्न पाणी ग्रहण करतो. त्यामुळे मी देखील हिंदूच आहे, असे प्रतिपादन आरिफ मोहम्मद खान यांनी केले आहे. Everyone born in India, who consumes India’s food and water is a Hindu, call me a Hindu too

तिरुअनंतपुरम मध्ये हिंदू कन्क्लेव्हला ते संबोधित करत होते. यावेळी आरिफ मोहम्मद खान यांनी हिंदू शब्दाचा ऐतिहासिक धार्मिक आणि सामाजिक आढावा घेतला. ते म्हणाले, की प्रख्यात मुस्लिम तत्त्वज्ञ सर सय्यद अहमद खान यांनी देखील हिंदू शब्द धार्मिक नसून भारताची भौगोलिक जान पहचान असल्याचे म्हटले होते. जो कोणी भारतात जन्माला आला, भारतात पिकवलेले अन्न खातो आहे, भारताच्या नद्यांचे पाणी पितो आहे तो हिंदू आहे, असे सर सय्यद अहमद खान हे देखील म्हणाले होते. याची आठवण आणि मोहम्मद खान यांनी करून दिली आहे.

 बीबीसी डॉक्युमेंटरीवर टीकास्त्र

त्याचवेळी अरिफ मोहम्मद खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने प्रदर्शित केलेल्या डॉक्युमेंटरीवर टिप्पणी केली. बीबीसीने कायमच पक्षपाती भूमिका घेतली आहे. भारतातले चांगले बीबीसीला दिसत नाही. भारताला जेव्हा g20 देशाचे अध्यक्षता मिळाली आहे, तेव्हाच बीबीसीने राजकीय टाइमिंग साधून पंतप्रधानांवरचे डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली आहे. पण याच बीबीसीने त्यांच्या देशातल्या उणीवांवर डॉक्यूमेंटरी केलेली नाही. ब्रिटिशांना असे वाटत होते की आपण सोडून गेल्यानंतर भारतातले लोक आपापसात संघर्ष करतील आणि भारत विखरून पडेल. पण तसे घडले नाही. उलट भारत अखंड राहिला आणि आता तर भारत वेगाने प्रगती करतो आहे, हे ब्रिटिश मानसिकतेच्या लोकांना पहावत नाही आणि म्हणूनच बीबीसी डॉक्युमेंटरी सारखे प्रयत्न ते चालवतात आणि भारताला पाण्यात पाहतात, असे टीकास्त्र आरिफ मोहम्मद खान यांनी सोडले आहे.

Everyone born in India, who consumes India’s food and water is a Hindu, call me a Hindu too

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात