भारत जोडो यात्रेच्या समारोपात काँग्रेस नेते बर्फ वृष्टीत छत्री खाली भिजले!!; 2024 मध्ये परिणाम काय दिसणार??


वृत्तसंस्था

श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात काँग्रेसचे सर्व नेते श्रीनगर मधल्या बर्फ वृष्टीत आज छत्री खाली भिजले…!! ही बातमी आल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परिणाम काय दिसणार??, असे सवाल तयार झाले आहेत. All Congress leaders drenched under umbrellas in the snow in Srinagar today during the concluding ceremony of the Bharat Jodo Yatra.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणुकीच्या प्रचारात साताऱ्यातल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भर पावसात बिनछत्रीचे भिजले होते. त्यामुळे महाराष्ट्रातले विधानसभेचे निकाल भरपूर बदलल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मराठी माध्यमांनी केला होता.

त्यानंतर महाराष्ट्रात पवारांनी शिवसेना भाजप महायुतीला बहुमत असताना वेगळा जुगाड करून महाविकास आघाडीचे सरकार आणून दाखवले होते. ते सरकार अडीच वर्षे चालले. पण त्याचे सगळे श्रेय मराठी माध्यमांनी साताऱ्यातल्या पावसाला दिले होते.

आज 30 जानेवारी 2023 रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोपात काँग्रेसचे वरिष्ठ नेते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महासचिव प्रियांका गांधी आणि अन्य काँग्रेस नेते श्रीनगर मधल्या बर्फदृष्टीत छत्री खाली भिजले आहेत. त्यांनी प्रचंड बर्फ वृष्टीत केंद्र सरकार विरोधी जोरात भाषणे केली आहेत. त्यामुळे आता दीड वर्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे येतात??, श्रीनगर मधल्या बर्फ वृष्टीत काँग्रेसचे नेते छत्री खाली भिजल्याने या भिजण्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत कसा आणि किती दिसणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

All Congress leaders drenched under umbrellas in the snow in Srinagar today during the concluding ceremony of the Bharat Jodo Yatra.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात