Women U19 WC : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला, अंडर-१९ टी-२० जिंकला वर्ल्डकप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवार खास ठरला. कारण भारतीय महिला संघाने अंडर-१९ टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. Indian women’s cricket team created history, won the U-19 T20 World Cup

त्यापूर्वी इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ ६८ धावांवर सर्वबाद झाला होता. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज चालले नाहीत आणि सुरुवातीच्या षटकातच त्यांचे गडी बाद होऊ लागले. इंग्लंडचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. भारताकडून टी. साधू, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

महिला संघाने अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकावर भारताचे नाव कोरल्यानंतर बीसीसीआयने पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत जय शहा यांनी माहिती दिली आहे.

भारतीय महिला संघाने प्रथमच विश्वचषक जिंकला आहे. त्यापूर्वी वरिष्ठ संघ काही प्रसंगी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता, परंतु त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते. आता यंग ब्रिगेड ऑफ इंडियाने हे स्वप्न साकार केले आहे. भारतीय महिला संघाने ३६ चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले आहे. सौम्या तिवारीने ३७ चेंडूत २४ धावा केल्या, तर जी. त्रिशानेही २४ धावांची खेळी खेळली. तसेच १६ धावांवर कर्णधार शफाली वर्माला १५ (११) हन्ना बेकरने अलेक्सा स्टोनहाउस करवीने झेलबाद केले.

Indian women’s cricket team created history, won the U-19 T20 World Cup

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात