राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा एकजुटीचा नेट, पण दोन मतांमध्ये घट!!


अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानासाठी सोडण्यास ईडीचा कोर्टात विरोध Mahavikas front’s unity net, but a decline in two votes


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभा निवडणूकीत १० जून शिवसेनेने दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांची एकत्रित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडेंट येथे बैठक झाली आहे. अशा प्रकारे एकेक मताला महत्व प्राप्त झाले असताना महाविकास आघाडीला दोन मतांना वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ईडीने केला विरोध 

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावे याकरता मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. त्याकरता एक दिवसाचा जामीन मिळावा, अशी विनंती केली आहे. त्यावर बुधवारी, ८ जून २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी मलिक आणि देशमुख यांना एक दिवसाचा जामीन मिळणार का, यावर फैसला होणार आहे. मात्र त्याआधीच ईडीने याला विरोध केला आहे. पीएमएलए विशेष न्यायालयात ईडीने तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे जर ईडीने केलेला विरोध न्यायालयाने ग्राह्य धरला तर मात्र महाविकास आघाडीला २ मतांपासून वंचित राहावे लागणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असून अन्य ७ आमदारांचा पाठिंबा आहे. अशी एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. तर भाजपलाही १३ मतांची गरज आहे.

Mahavikas front’s unity net, but a decline in two votes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात