राज्यसभा निवडणूक : शिवसेनेचे आमदारांना मतदान प्रक्रियेचे 3 दिवस पंचतारांकित प्रशिक्षण!!


आमदारांना कोंडले म्हणणारे मूर्ख, मतदान प्रक्रिया समजावण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवल्याचा राऊतांचा दावा Shivsena kept its MLAs in five star hotel to voter training program, Claims sanjay raut


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना आपल्या आमदारांना मतदानाचे साधेसुधे नाही, तर पंचतारांकित प्रशिक्षण देत आहे. एवढेच नव्हे, तर आमदारांना कोंडले म्हणणारे मूर्ख आहेत. मतदानाची प्रक्रिया समजावण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवले आहे, असा दावा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेच्या आमदारांना 3 दिवस मालाडमधील रिट्रीट हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले आहे. त्यावरून विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना आपल्या आमदारांवर विश्वास नाही का?, असा सवाल विरोधकांनी केला. त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.



संजय राऊत म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक असते. त्यासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यावरून शिवसेनेने आमदारांना कोंडले, असे म्हणणारे मूर्ख आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपने देखील आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केला जात नाही?, असा सवालही त्यांनी केला.

शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येतील राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपल्या पक्षातील आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येतील. तसेच, महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.

– क्रॉस व्होटिंग होणार नाही

राऊत म्हणाले, राज्यसभा निवडणुकीसाठी आमदारांना गुप्त मतदान करता येत नाही. आपण कोणाला मतदान करतोय, हे दाखवूनच त्यांना मतदान करावे लागते. त्यामुळे या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार नाही. संख्याबळामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार आघाडीच्या उमेदवारांना जिंकून आणतील, असा दावा त्यांनी केला.

Shivsena kept its MLAs in five star hotel to voter training program, Claims sanjay raut

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात