लागोपाठ बलात्काराच्या घटनांनी हादरला महाराष्ट्र; राज्य महिला आयोग दीड वर्षांपासून रिक्तच, ठाकरे-पवार सरकार ढिम्मच!!

Maharashtra shocked after Saki naka rape case, Thackeray govt yet Not appointed chairperson for state womens commission

state womens commission : साकिनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा दुर्दैवा मृत्यू झाला आहे. तिच्यावर दिल्लीतल्या निर्भयासारखे अत्याचार झाले. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने तीव्र शब्दांत टीका केली आहे. Maharashtra shocked after Saki naka rape case, Thackeray govt yet Not appointed chairperson for state womens commission


विशेष प्रतिनिधी

मुंबई : साकिनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा दुर्दैवा मृत्यू झाला आहे. तिच्यावर दिल्लीतल्या निर्भयासारखे अत्याचार झाले. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने तीव्र शब्दांत टीका केली आहे. दुसरीकडे, राज्यभरातूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. हे सगळे घडत असताना मुख्यमंत्री ठाकरे आरोपीला कडक शासन करणार असल्याचे सांगत आहेत. पण राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद या सरकारने अद्यापही भरलेले नाही, हे ते विसरतात.

मुंबईतील घटनेआधी पुण्यातही लागोपाठ तीन-चार अत्याचाराच्या घटना झाल्या. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचे यावरून दिसत आहे. असे असतानाही सरकारने राज्य महिला आयोगाला अध्यक्ष न देऊन राज्यातील महिलांबाबत औदासीन्य का दाखवावे हे कोडेच आहे.

गत महिन्यातच औरंगाबादेत भाजप महिला आघाडीतर्फे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद भरण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव सविता कुलकर्णी यांनी आरोप केला होता की, राज्यात महिलांविरुद्ध अत्याचारांत वाढ होत आहे, तरीही ठाकरे सरकार बदल्याचे राजकारण करण्यात गुंतले आहे. त्या म्हणाल्या होत्या की, हे सरकार मागच्या 19 महिन्यांपासून सत्तेत आहे, पण तरीही त्यांनी महाराष्ट्राचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त ठेवले आहे.

 

तीन तिघाडीमधून महिला आयोगात दीड वर्षांपासून बिघाडी!

ठाकरे -पवार सरकारमधील अंतर्गत वादावादीतून महिला आयोग रिक्त ठेवल्याचे अनेक वेळेला स्पष्ट झाले आहे. स्वतः महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांनी बद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. “सात-आठ वेळेला फाईल पाठवूनही आयोगातील पदे भरलेली नाहीत,” अशी तीव्र नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती. आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला हवे आहे. काँग्रेसचाही त्यावर दावा तितकाच दमदार आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना हे पद काँग्रेसकडेच होते. या अंतर्गत संघर्षातून गेले दीड वर्ष आयोगाला अध्यक्ष मिळालेला नाही. कोविडसारख्या संकटात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असूनही आयोग दुबळ्या अवस्थेत निपचीत पडलेला आहे! विजया रहाटकर यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत झळाळून निघालेल्या आयोगाची सध्या पुन्हा एकदा पूर्वीसारखी दुरवस्था झाली आहे.

 

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद तर हे अराजकीय स्वरूपाचे असते. आयोगाच्या १९९३ मधील कायद्यान्वये या पदाला संरक्षण आहे. महिला आयोग राज्य सरकारला शिफारशी करू शकते. महिलांना न्याय मिळवून देण्यात आयोगाची महत्त्वाची भूमिका असते. महिला आयोगामुळेच अनेक प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली जाते. पण या तीन पक्षांच्या सरकारने अद्याप नियुक्त्याच केलेल्या नाहीत. सरकारचे हे वेळकाढू धोरणही महिलांवर अन्याय करणारेच आहे, असाच सूर आता उमटू लागला आहे.

Maharashtra shocked after Saki naka rape case, Thackeray govt yet Not appointed chairperson for state womens commission

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात