वाचा… विजय रूपाणींच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी, भाजपच्या ‘विजय’ मोहिमेत अनफिट ठरले रूपाणी

Vijay Rupani Resigns now these three leaders are in race for post of Gujarat Chief Minister

CM Vijay Rupani Resigns : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाणी यांना हटवण्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. त्यांनी आता राजीनामा का दिला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता अशी चर्चा सुरू आहे की, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला नेतृत्व बदल आवश्यक वाटला, विजय रुपाणी गुजरात विजयासाठी भाजपच्या दृष्टीने अनफिट ठरत होते. रूपाणी यांनी राजीनामा देण्यासाठी चार कारणे महत्त्वाची ठरली आहेत. Why Gujarat CM Vijay Rupani Resigns, Read Four Reasons Behind His Resignation


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाणी यांना हटवण्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. त्यांनी आता राजीनामा का दिला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता अशी चर्चा सुरू आहे की, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला नेतृत्व बदल आवश्यक वाटला, विजय रुपाणी गुजरात विजयासाठी भाजपच्या दृष्टीने अनफिट ठरत होते. रूपाणी यांनी राजीनामा देण्यासाठी चार कारणे महत्त्वाची ठरली आहेत.

1. चांगल्या परफॉर्मन्सचा दबाव

गत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये अत्यंत कठीण विजय मिळवला होता. यानंतर हे सरकार चार वर्षे चालले, परंतु निवडणुकीसाठी एक वर्ष शिल्लक असल्याने, पक्षाला येथे कोणताही धोका पत्करायचा नव्हता. सीआर पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रूपाणी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमित शहा यांच्या जवळ असल्याने रुपाणी यांची खुर्ची अजूनही शाबूत होती. पण सी.आर. पाटील यांनी आता पक्षाला स्पष्ट केले होते की, पुढच्या वर्षी निवडणुकीत मोठा विजय मिळवायचा असेल तर नेतृत्व बदलावेच लागेल.

2. जातीय समीकरणात रूपाणी अनफिट

विजय रूपाणी यांना चेहरा करून पक्षाला पुढील निवडणूक लढवायची नव्हती. गुजरातचे जातीय समीकरण हे त्यामागचे एक प्रमुख कारण होते. रुपाणी तटस्थ होते आणि त्यांच्या काळात पक्षाला जातीय समीकरणे साध्य करणे कठीण जात होते. गुजरातचे जातीय समीकरण सोडवण्यासाठी काही काळापूर्वी मनसुख मंडाविया यांना केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले होते.

3. सीआर पाटील यांच्याशी मतभेद

विजय रूपाणी यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्याशी झालेली दुरावा असल्याचे सांगितले जात आहे. पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीला दोघांमध्ये दुरावा नव्हता. पाटील यांनी पक्ष नेतृत्वापुढे आपला हेतू व्यक्त केला आहे की, त्यांना राज्यात मोठा विजय मिळवायचा आहे. विजय रुपाणी त्यांच्या या योजनेत बसत नव्हते. त्यामुळे त्यांना खुर्ची सोडावी लागली.

4. पंतप्रधानांची नाराजी

कोरोनाची दुसरी लाट रूपाणींसाठी मोठी समस्या बनून आली. यादरम्यान गुजरातमध्ये गैरव्यवहाराच्या अनेक बातम्या समोर आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या मूळ राज्यात असा निष्काळजीपणा पाहून पंतप्रधान मोदी खूप अस्वस्थ झाले. याच कारणामुळे त्यांनी गुजरातमधील नेतृत्व बदलाबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही.

 

Why Gujarat CM Vijay Rupani Resigns, Read Four Reasons Behind His Resignation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात