Lockdown Update : लॉकडाऊन पुन्हा माहिनाअखेर वाढणार; १५ मे नंतरही कायम राहण्याची शक्यता


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 मे नंतर हा लॉकडाऊन 15 दिवसांसाठी वाढविला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Lockdown Update : Lockdown will increase again by the end of the month; Likely to continue after May 15

कोरोनाच्या संसर्गामुळे 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत वाढवला होता. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र तरीही रोज 40-50 हजार बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.



बुधवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय

बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय होणार आहे. अनेक जिल्ह्यात रूग्णवाढ सुरु आहे, त्यामुळे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन कायम ठेवला जाऊ शकतो.  लॉकडाऊनचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. टास्क फोर्स आणि महाविकास आघाडी मिळून निर्णय घेईल, असं अस्लम शेख यांनी सांगितले.

दरम्यान, जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं.

Lockdown Update : Lockdown will increase again by the end of the month; Likely to continue after May 15

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात