अमेरिकेतील भीषण चित्र : न्यूयॉर्कमध्ये पहिल्या लाटेतील साडेसातशे मृतदेह अजूनही आहेत रस्त्यांवरील उभ्या ट्रकमध्ये!


गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये वर्ष उलटून गेले तरी अद्यापही कोरोनामुळे मृत्यू झालेले साडेसातशे मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शितगृहाची (रेफ्रिजरेशन) सोय असलेल्या ट्रकमध्ये हे मृतदेह असून विशेष म्हणजे ते हे ट्रक रस्त्यावरच उभे करून ठेवण्यात आले आहेत.Horrible picture in America, seven and a half hundred bodies still waiting for the funeral in New York, bodies in trucks parked on the road


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये वर्ष उलटून गेले तरी अद्यापही कोरोनामुळे मृत्यू झालेले साडेसातशे मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शितगृहाची (रेफ्रिजरेशन) सोय असलेल्या ट्रकमध्ये हे मृतदेह असून विशेष म्हणजे ते हे ट्रक रस्त्यावरच उभे करून ठेवण्यात आले आहेत.न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सनसेट पार्क येथील ३९ नंबर रस्त्यावर हे ट्रक उभे आहेत.



न्यूयॉर्क शहरातील मुख्य वैद्यकीय अधिकाºयांनीही याला दुजोरा दिला आहे. या मृतदेहांवर लवकरात लवकर अंत्यविधी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाच्या उपायुक्त डायना मॅनिओटीस यांनी सांगितले की, यातील बहुतांश मृतदेहांना ब्रॉँक्स येथील हार्ट आयलॅँड येथे दफन करण्यात येणार आहे. याठिकाणी शहरातील गरीब आणि निराधार मृतदेहांचे दफन केले जाते.

त्यासाठी आम्ही हे मृतदेह असलेल्या कुटुंबांशी बोलत आहोत. या कुटुंबांनी आम्हाला परवानगी दिल्यावर तातडीने त्यांचे हार्ट आयलॅँड येथे दफन करण्यत येईल.

हार्ट आयलॅँडमध्ये दहा लाखांहून अधिक मृतदेहांचे दफन केले आहे. काही किलोमीटर लांब असलेली ही अमेरिकेतील सर्वात मोठी दफनभूमी आहे. याठिकाणी शहरातील एक दशांत कोरोनाबाधितांना दफन करण्यात आले असल्याचे कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासात म्हटले आहे.

या अहवालानुसार, या दफनभूमीत २०२० मध्ये २,३३४ जणांचे दफन करण्यात आले. २०१९ पेक्षा हा आकडा दुपटीहूनअधिक आहे.२०२० च्या एप्रिलमध्ये या दफनभूमीची ड्रोनमधून घेतलेली भीतीदायक छायाचित्रष प्रसिध्द झाली होती.

गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये न्यूयॉर्क शहरात कोरोनाचा सर्वाधिक कहर होता. न्यूयॉर्क शहराची दररोजची दफनांची क्षमता २० होती. मात्र, दररोज २०० हून अधिक मृतदेहांचे दफन होत होता, असे वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या वृत्तात म्हटले होते.

न्यूयॉर्कमधील बहुतांश दफनभूमींमध्ये जागाच नसल्याने दीर्घकाळ मृतदेह ठेवण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी शितगृहाची व्यवस्था असलेले ट्रक आणण्यात आले.

याठिकाणी मृतदेह ठेऊन त्यांच्या कुटुंबाला आपल्या प्रिय व्यक्तीचे हवे त्या ठिकाणी दफन करणे शक्य व्हावे असा त्यामागचा उद्देश होता. संवेदनशीलपणे या कुटुंबांशी संपर्क साधण्यात येत होता.

या पध्दतीने ५०० ते ८०० मृतदेह ट्रकमध्ये स्टोअर करून ठेवण्यात आले होते. यातील अनेक कुटुंबांनी हार्ट आयलॅँडवरून दफन करण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यातील अनेक कुटुंबांचा आता संपर्कच होत नसल्याचे न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाचे म्हणरे आहे.

गेल्या वर्षी न्यूयॉर्कमधील रुग्णालयांच्या समोर शितगृहाची व्यवस्था असलेले अनेक ट्रक उभे दिसत होते. न्यूयॉर्कमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत असल्याने फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने हे ट्रक पाठविले होते. त्यावरून बळींच्या संख्येचा अंदाजही येत होता. त्यामुळे न्यूयॉर्क शहराने कोरोनावर विजय मिळविल्याचा दावाही फोल ठरला होता.

Horrible picture in America, seven and a half hundred bodies still waiting for the funeral in New York, bodies in trucks parked on the road

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात