इतर राज्यांना ऑक्सिजन देण्यास केरळचा थेट नकार


कोरोना महामारीच्या संकटात जगातले सगळे देश एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. व्यवहार्य नसल्याचे कारण देत देशातील सुशिक्षित राज्य असणाऱ्या केरळने वेगळी भूमिका घेतली आहे. कम्युनिस्टांचे सरकार असलेल्या केरळने इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. Kerala’s direct refusal to provide oxygen to other states, Chief Minister Pinarayi Vijayan wrote to the Centre


प्रतिनिधी

नवी दिल्ली : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अन्य राज्यांना ऑक्सिजन पुरवणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याचे केंद्र सरकारला पत्र पाठवून कळवले आहे. केरळमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे कारण त्यांनी यासाठी दिले आहे.

सोमवारी (दि. 10) विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केरळने 450 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा करुन ठेवला होता. यातून नँशनल ग्रीडवर भार न टाकता केरळची गरज भागवण्याचा प्रयत्न केला जात होता.



मात्र शेजारी राज्यांच्या मागणीमुळे बफर स्टॉकमधील ऑक्सिजनची वाहतूक होऊ दिली. हा बफर स्टॉक आता केवळ 86 टनांपर्यंत खाली आला असल्याचे विजयन यांनी म्हटले. सध्या केरळमध्ये 4 लाख 2 हजार 650 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

पंधरा मेपर्यंत कोरोना रुग्णांची ही संख्या 6 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. येत्या पंधरा मेपर्यंतच्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी रुग्णालयांची आणि साडेचारशे टन ऑक्सिजनची गरज भासू शकते, असे विजयन यांनी पंतप्रधानांना म्हटले आहे.

“ऑक्सिजन वाटपासंबंधी 6 मे रोजी केंद्रीय समितीची बैठक झाली होती. त्यात केरळ तामिळनाडूला 10 मेपर्यंत 40 टन ऑक्सिजन देईल असा निर्णय झाला होता. मात्र सद्यस्थिती पाहता यानंतर आता ऑक्सिजन राज्याबाहेर जाऊ देणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे,”

असे विजयन यांनी मोदींना कळवले आहे. भौगोलिकदृष्ट्या केरळ राज्य देशातल्या मुख्य स्टील प्रकल्पांपासून दूर अंतरावर आहे. अत्यल्प वेळेत या प्रकल्पांमधून केरळमध्ये ऑक्सिजनची वाहतूक करणे फार अवघड आहे. त्यामुळे केरळात उत्पादित होणारा 219 टन ऑक्सिजन हा दक्षिणी राज्यांसाठीच दिला जावा, अशी विनंती त्यांनी मोदी यांना केली आहे.

पत्रकार परिषद घेऊन विजयन यांनी सांगितले की ऑक्सिजन वाहतुकीसाठी आवश्यक क्रायोटँकरचे वितरण केंद्राने लवकरात लवकर करावे असी मागणी केली आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळसाठी धावणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसमधील क्रायोटँकर द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन राज्यांना पुरवण्यासाठी दिले जावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Kerala’s direct refusal to provide oxygen to other states, Chief Minister Pinarayi Vijayan wrote to the Centre

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात