‘केरळ सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे’, राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे मत

Kerala Is Sitting On Top Of Volcano, says CM Pinarayi Vijayan

CM Pinarayi Vijayan : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत भरमसाट वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी म्हटले की, राज्य सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पुन्हा एकदा सर्वांनी खबरदारी बाळगली पाहिजे. घाबरून जाऊ नका. अनावश्यक घराबाहेर पडू नका. शारीरिक अंतर राखा आणि तोंडावर मास्क आवर्जून वापरा. Kerala Is Sitting On Top Of Volcano, says CM Pinarayi Vijayan


विशेष प्रतिनिधी

तिरुवनंतपुरम : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत भरमसाट वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी म्हटले की, राज्य सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पुन्हा एकदा सर्वांनी खबरदारी बाळगली पाहिजे. घाबरून जाऊ नका. अनावश्यक घराबाहेर पडू नका. शारीरिक अंतर राखा आणि तोंडावर मास्क आवर्जून वापरा.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील खासगी रुग्णालयांनी विशेष रूपाने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 25 टक्के बेड रिकामे ठेवावेत. ते म्हणाले की, कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी क्षेत्राने सरकारसोबत काम करण्याचे आश्वासन दिले आहे. केरळ सरकार संबंधित जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयातील बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटरचा डेटा जारी करेल. हा डेटा जनतेसाठी ई-जागृती पोर्टलवर अपलोड केला जाईल.

सध्या केरळमध्ये कोरोनाचे उपचार सरकारी रुग्णालयांत मोफत आहेत. याशिवाय केएएसपी अंतर्गत खासगी रुग्णालयांत सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. केएएसपी अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांसाठी सरकारने म्हटले की, एका रुग्णाचा डिस्चार्ज झाल्यावर एका निश्चित दरानुसार त्यांना खर्च देण्यात येईल. यामुळे मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त खासगी रुग्णालयांना याअंतर्गत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Kerala Is Sitting On Top Of Volcano, says CM Pinarayi Vijayan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात