विधान परिषद निवडणूक; नवाब मलिक म्हणतात, भाजपचा घोडेबाजार!!; अरविंद सावंत म्हणतात, आघाडीतल्या विश्वासाला तडा गेला!!


प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो दणकून पराभव झाला आहे, त्याचे राजकीय पडसाद महाविकास आघाडीतच उमटले आहेत. पराभव शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया यांचा झाला आहे. नागपुरात काँग्रेस हरली आहे, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठा आवाज काढत भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे.Legislative Council elections; Nawab Malik says, BJP’s horse market !!; Arvind Sawant says, the faith in the front has been shattered

पण आता शिवसेनेच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षांमध्ये विश्वासाचा तडा गेला आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे…!! शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी अकोला वाशिम मतदारसंघात गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव होण्यामागची कारणे विशद केली. तेव्हा विश्‍वासाला तडा गेल्याचे वक्तव्य केले आहे.



राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषद निवडणुकीत भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप केला होता. त्यालाच खासदार अरविंद सावंत यांनी छेद दिल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

गोपीकिशन बाजोरिया हे तगडे उमेदवार होते. शिवसेनेची स्वतःची मते अकोला वाशिम मतदार संघात कमी होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची मते जास्त होती. पण ती सगळी मते शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना मिळालेली नाहीत, अशी खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

अरविंद सावंत हे अकोला वाशिममध्ये आठवडाभर मुक्काम ठोकून होते. ते सगळ्या नेत्यांच्या संपर्कात होते. आता या संदर्भातला सविस्तर अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो दणकून पराभव झाला आहे, त्यातून महाविकास आघाडीतल्या तीनही घटक पक्षांमध्ये मधली राजकीय दरी रुंदावल्याचे उघड झाले आहे.

Legislative Council elections; Nawab Malik says, BJP’s horse market !!; Arvind Sawant says, the faith in the front has been shattered

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात