Karnataka MLC Election Results : कर्नाटक विधान परिषदेतही भाजपची विजयी घोडदौड, 25 पैकी 12 जागांवर विजय, तर काँग्रेस आणि जेडीएसचा असा आहे निकाल

Karnataka MLC Election Results BJP wins 12 out of 25 seats, Read More About Congress and JDS results

Karnataka MLC Election Results : कर्नाटक विधान परिषदेच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आज म्हणजेच मंगळवारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधान परिषदेत 12 जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. 75 सदस्यीय विधान परिषदेत भाजपचे आता 38 सदस्य आहेत. या 25 जागांपैकी 11 जागा काँग्रेसने जिंकल्या. एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरला (जेडीएस) मोठा झटका बसला आहे. 25 जागांपैकी जेडीएसला फक्त एक जागा मिळाली आहे. एचडी देवेगौडा यांचे नातू सूरज रेवन्ना हासन मतदारसंघातून विजयी झाले आहेत. Karnataka MLC Election Results BJP wins 12 out of 25 seats, Read More About Congress and JDS results


वृत्तसंस्था

बंगळुरू : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा पैकी चार जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने कर्नाटक विधान परिषदेतही विजयाची परंपरा कायम राखली आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आज म्हणजेच मंगळवारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधान परिषदेत 12 जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. 75 सदस्यीय विधान परिषदेत भाजपचे आता 38 सदस्य आहेत. या 25 जागांपैकी 11 जागा काँग्रेसने जिंकल्या. एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरला (जेडीएस) मोठा झटका बसला आहे. 25 जागांपैकी जेडीएसला फक्त एक जागा मिळाली आहे. एचडी देवेगौडा यांचे नातू सूरज रेवन्ना हासन मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

कोडागु मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सुजा कुशलप्पा विजयी झाल्या आहेत. बिदरमधून काँग्रेसचे उमेदवार भीमराव पाटील विजयी झाले आहेत. बेल्लारीमध्ये भाजपचे येचरेड्डी सतीश यांनी विद्यमान एमएलसी आणि काँग्रेसचे उमेदवार केसी कोंडय्या यांच्यावर विजय मिळवला आहे. कलबुर्गी-यादगिरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बी. जी. पाटील विजयी झाले आहेत. त्यांना 149 मतांनी हा विजय मिळाला. शिवमोग्गा येथून भाजपचे डीएस अरुण विजयी झाले आहेत.

10 डिसेंबरला झाली निवडणूक

स्थानिक प्राधिकरण क्षेत्रातील या 25 जागांवर 10 डिसेंबर रोजी निवडणूक झाली होती. हे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे मतदानाद्वारे निवडले जातात. या सर्व जागांवर आज मतमोजणी झाली. या 25 जागांपैकी काँग्रेसला 14, भाजपला 7 आणि जेडीएसला 4 जागा मिळाल्या होत्या. कर्नाटक विधान परिषदेत एकूण 75 जागा आहेत, ज्यामध्ये 25 जागांपैकी एक तृतीयांश जागांसाठी दर दोन वर्षांनी मतदान होते.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गृहजिल्ह्यातील हावेरी येथील हंगल जागा गमावल्यानंतर या निवडणुकीत चांगली कामगिरी भाजपसाठी मनोबल वाढवणारी आहे. तत्पूर्वी, वाराणसीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी भाजपच्या बाजूने चांगले निकाल लागण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

Karnataka MLC Election Results BJP wins 12 out of 25 seats, Read More About Congress and JDS results

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात