संजय राऊतांवरचा एफआयआर मागे घेण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांची फौज पोहोचली दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर मागे घेण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांची फौज दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांना भेटली आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि स्वतः खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे लोकसभेतील सगळे खासदार आज राकेश अस्थाना यांना भेटले आहेत.Army of all Shiv Sena MPs reached Delhi Police Commissioner to withdraw FIR against Sanjay Raut

संजय राऊत यांनी महिलांनी विषयी काही अपशब्द वापरले होते. त्याचे रेकॉर्डिंग करून भाजपच्या नेत्या दीप्ती रावत भारद्वाज यांनी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय फौजदारी कायद्याच्या कलम 500 आणि 509 या नुसार एफआयआर दाखल झाला आहे.



या प्रकरणावरून संजय राऊत यांनी दोनदा वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते त्यांनी वापरलेला “तो” शब्द असंसदीय नाही. “तो” शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील पूर्वी वापरला आहे. “त्या” शब्दाची एक जमात देखील भारतात आहे, असे समर्थन त्यांनी केले आहे. परंतु त्यांच्या विरोधातला एकआयआर मात्र अद्याप मागे घेण्यात आलेला नाही.

संजय राऊत यांनी आज मी दिल्लीतच बसलो आहे. “काय यायचे असेल तर या”, असे आव्हान देखील दिले होते. परंतु सायंकाळी शिवसेनेच्या सर्व खासदारांची फौज दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांच्या कार्यालयात जाऊन पोहोचली आणि यांनी संजय राऊत यांच्या विरोधातील हे एफआयआर मागे घ्यावा, अशी मागणी केली.

Army of all Shiv Sena MPs reached Delhi Police Commissioner to withdraw FIR against Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात