नोकरीची संधी : IDBI बँकेत 1500 पेक्षा जास्त जागांवर भरती!! 


प्रतिनिधी

मुंबई : आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांवर मोठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून पगारही 30000 पेक्षा जास्त असणार आहे. एग्जीक्यूटिव्ह आणि असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदांसाठी 1544 जागांवर ही भरती आहे. यामध्ये एग्जीक्यूटिव्ह  पदाच्या 1044 तर असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए च्या 500 पदासाठी भरती होणार आहे.Job Opportunity: Recruitment for more than 1500 posts in IDBI Bank

इच्छूक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख 17 जून 2022 आहे. भरतीबाबतची सर्व माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



पात्रता काय?

एग्जीक्यूटिव्ह आणि असिस्टेंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराची कोणत्याही शाखेतून आणि मान्यता असलेल्या विद्यापीठातून पदवी असावी.

 वयाची अट काय?

एग्जीक्यूटिव्ह पदासाठी उमेदरावाचे वय 1 एप्रिल 2022 पर्यंत 20 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर असिस्टेंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्तीत 28 असावे.

निवड झालेल्यांना पहिल्या वर्षी 29000 , दूसऱ्या वर्षी 31000 आणि तिसऱ्या वर्षी 34000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.
एग्जीक्यूटिव्ह पद हे एक वर्षाच्या  कॉन्ट्रॅक्टवर असेल.. त्यानंतर पुढे तुमच्या कामगिरीच्या आधारावर मर्यादा वाढवली जाईल. तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर उमेदवार असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी पात्र होईल.
असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए

असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदाची भरती PGDBF 2022-23 मध्ये एडमिशनच्या आधारावर होईल. शॉर्टिस्टेड उमेदवारांना  बँकिंग आणि फायनांसमध्ये एका वर्षाच्या पीजी डिप्लोमा कोर्ससह ट्रेनिंग दिली जाईल. कोर्स संपल्यानंतर बँक त्या उमेदवारांना असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदावर नियुक्त करेल.

Job Opportunity: Recruitment for more than 1500 posts in IDBI Bank

महत्वाच्या बातम्या

 

 

 

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात