100 कोटींची वसुली : अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र दाखल; सचिन वाझे माफीचा साक्षीदार!!


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात ठाकरे – पवार सरकार मधील राजीनामा द्यावा लागलेले
गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने आज आरोपपत्र दाखल केले आहे. cbi



त्यामुळे अनिल देशमुख त्यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ झाली आहे. कारण या प्रकरणात कोर्टाने पोलीस अधिकारी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार व्हायला मंजुरी दिली आहे. मात्र माफीचा साक्षीदार होताना सीबीआयच्या विशेष कोर्टाने विशेष अटी व शर्ती घातल्या आहेत.

  •  अर्थात सचिन वाजे त्यामुळे तुरुंगातून सुटणार नाही. परंतु त्याची साक्ष या खंडणी प्रकरणात कायदेशीर दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची ठरू शकेल.
  •  कोर्टाने परवानगी दिल्यानुसार सचिन वाझे यापुढे या खटल्यातील आरोपी राहणार नाही तर यापुढे फिर्यादी साक्षीदार म्हणून गणला जाईल.
  •  विशेष न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी आज वाझे यांना सांगितले की त्यांची माफीची याचिका खालील अटींच्या अधीन मान्य करण्यात आली आहे.
  •  सचिन वाझेला खंडणी आणि अन्य गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती असलेल्या तथ्यांचा पूर्ण आणि प्रामाणिक खुलासा करावा लागेल
  •  विशेष सरकारी वकिलाने खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्याला विचारलेल्या प्रश्नांची त्याना अचूक आणि सत्यतेने उत्तरे द्यावी लागतील.
  •  सचिन वाझेने या अटी मान्य केल्यानंतरच न्यायालयाने त्यांची याचिका मान्य केली आहे.
  •  सचिन वाझे यापुढे या प्रकरणात आरोपी राहणार नसल्याने सीबीआय त्याच्यावर आरोपपत्र दाखल करणार नाही.
  •  सचिन वाझे यांना यापुढे फिर्यादी साक्षीदार मानले जाईल, ज्याची साक्ष देशमुख यांच्यासह त्यांच्या सहआरोपींच्या विरोधात वापरली जाऊ शकते. अर्थात वाझेची त्यामुळे तुरुंगातून सुटका होईल असे नाही.
  •  कारण सचिन वाझे अंटालिया जिलेटीन प्रकरणात देखील NIA च्या केस मध्ये आरोपी आहे. यात तो माफीचा साक्षीदार नाही. त्यामुळे वाझे बाहेर येणार नाही. या प्रकरणात किमान 5 वर्षे तरी तुरूंगात राहव लागण्याची शक्यता आहे

CBI files chargesheet against Anil Deshmukh

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात