‘रोज असे लाखो विनयभंग होतात’; ‘मर्द असाल तर मैदानात येऊन लढा’; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची वक्तव्ये; मानसिकता काय दाखवते?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : “रोज असे लाखो विनयभंग होतात म्हणून काय गुन्हे नोंदवले जातात का?”, “मर्द असाल तर मैदानात येऊन लढा”, ही वक्तव्ये आहेत, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची. Jitendra avahad’s wife ruta avahad supports him, but made controversial statements

रीडा रशिदा या भाजप कार्यकर्तीने आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध 354 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये कायदेशीर कारवाई पुढे गेली तर तीन वर्षांची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बवाल उसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर त्याने समर्थन केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून ते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यापर्यंत सगळेच नेते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ नये यासाठी गळ घातली आहे.


जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची हूल; शिंदे – फडणवीसांमध्ये फूट पाडण्याची धूर्त चाहूल!


 

या सगळ्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी देखील पुढे घेऊन आपल्या पतीचे समर्थन केले आहे. “महाराष्ट्रात, मुंबईत रोज असे लाखभर विनयभंग होतात. पण म्हणून काय त्यावर गुन्हे दाखल होतात का?”, असा सवाल ऋता आव्हाड यांनी केला आहे. इतकेच नाही, तर सरकारमधील नेत्यांना त्यांनी, “मर्द असाल तर, समोरून येऊन लढून दाखवा”, असे आव्हान दिले आहे.

ऋता आव्हाड यांनी पत्नी म्हणून आपल्या पतीचे समर्थन करण्याच्या वेळी जी वक्तव्ये केली आहेत, त्याचा नेमका अर्थ काय होतो??, या विषयी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये रोज लाखो विनयभंग होतात कारण लोकलमध्ये गर्दीमध्ये अशा प्रकारचे धक्के लागतात असे त्यांचे म्हणणे आहे. पण जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला खांद्याला धरून बाजूला काढले आहे, तसे मुंबईच्या लोकलमध्ये किंवा अन्यत्र घडते का??, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर मर्द असाल तर समोर येऊन लढा असे जे वक्तव्य ऋता आव्हाड यांनी केले आहे. त्याचा नेमका अर्थ काय??, मर्द पणा कशातून दाखवायचा??, जितेंद्र आव्हाड यांनी जे केले तो मर्द पण होता काय??, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.

Jitendra avahad’s wife ruta avahad supports him, but made controversial statements

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात