राष्ट्रवादीची चाल : ‘पाटलाच्या पोरांना लग्नाआधी बाळं होतात’ वादग्रस्त विषय बाजूला; जितेंद्र आव्हाडांचा विषय पेटवला


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेले दोन दिवस वेगवेगळ्या वादग्रस्त विषयांमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राजकीय चतुराईची चाल खेळत “पाटलाच्या पोरांना लग्नाआधी बाळ होतात” हा विषय बाजूला सरला आणि जितेंद्र आव्हाडांचा विषय पेटवला आहे. ‘Patil boys have babies before marriage’ controversial topic aside

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणुकीच्या प्रचारात टाकळी सिकंदर येथे एक वादग्रस्त विधान केले. पाटलाच्या पोरांना लग्नाआधी बाळं होतात. त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे, असे ते म्हणाले. हा विषय राज्याच्या राजकारणात पेटला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. खासदार सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजन पाटलांच्या वक्तव्यावर चकार शब्द काढला नाही.

महिला पत्रकाराला, “तू कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो”, एवढे वाक्य उच्चारल्यानंतर संभाजी भिडे गुरुजींना नोटीस पाठवणाऱ्या महिला आयोगाने राजन पाटलांवर कारवाईतला “क” सुद्धा उच्चारला नाही. सुप्रिया सुळे यांनी देखील वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देताना राजन पाटलांचा विषय देखील काढला नाही.



या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सगळीकडून घेरली असताना जितेंद्र आव्हाडांचा विषय सुरू झाला. हर हर महादेव सिनेमाचा खेळ बंद पडताना केलेल्या मारामारीच्या प्रकरणात आव्हाडांना कार्यकर्त्यांसह अटक झाली. नंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली. तो विषय सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तापवला. त्यानंतर कळवा पुलाचे उद्घाटन झाले. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली. स्टेजवरची लढाई खाली आली. जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला तिच्या दंडाला धरून मुख्यमंत्र्यांच्या गाडीपासून बाजूला काढले.

या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यावर आव्हाडांच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची हूल उठवली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळव्याच्या रस्त्यावर टायर जाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा विषय आता पेटवला आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे पोलिसांनी आपल्या मर्यादा पाडून काम करावे, असा सल्ला ही जयंत पाटलांनी दिला आहे.

पण एकीकडे माजी आमदार राजन पाटलांनी पाटलांना लग्नाआधी बाळं होतात, हे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक चकार शब्दही उच्चारला नाही, तर आता दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांचा विषय जोरदार पेटवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

‘Patil boys have babies before marriage’ controversial topic aside

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात