महिलेशी गैरवर्तन, विनयभंगाचा गुन्हा; जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा की नुसतीच हूल?


विशेष प्रतिनिधी

ठाणे : कळवा पुलाच्या उद्घाटन समारंभाच्या राजकीय लळीतानंतर जितेंद्र आव्हाड यांचीच परत चर्चा सुरू झाली आहे. पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी महिलेशी गैरवर्तन केल्यास आरोप झाला असून पोलीसांनी त्यांच्याविरुद्ध कलम 354 चा विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला आहे.
Offense of molestation, molestation of woman; Jitendra Awhad’s resignation

त्यानंतर रात्रीच जितेंद्र आव्हाड यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करून पोलिसांनी आपल्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करून आपण आमदारकीचा राजीनामा द्यायचा विचार करतो आहोत, असे म्हटले आहे. परंतु राजकीय वर्तुळात मात्र आव्हाडांनी राजीनाम्याची ऑफर दिली आहे की नुसतीच हूल दिली आहे??, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कळवा पुलाच्या उद्घाटन समारंभात जितेंद्र आव्हाड विरुद्ध खासदार एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या लढाईचे साक्षीदार होते. या श्रेयवादाच्या लढाईनंतर कार्यक्रम आटोपताच झालेल्या गर्दीत जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेचा हात धरून तिला बाजूला सारले. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. संबंधित महिला भाजपची पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते. तिने याविषयी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कलम 354 चा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवला.

त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करून आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याची म्हटले आहे. मात्र त्याआधी मुख्यमंत्र्यांना इशारा देत चाणक्य नव्हे, शकुनी मामा मुख्यमंत्री साहेब सावध राहा, असा इशाराही दिला. जितेंद्र आव्हाड यांच्या या श्रेयवादाची लढाई ते विनयभंगाचा गुन्हा आणि त्यानंतर राजीनाम्याची ऑफर की हूल या बातमीमुळे ते पुन्हा आज चर्चेचा केंद्रबिंदू होऊ पाहत आहेत.

Offense of molestation, molestation of woman; Jitendra Awhad’s resignation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात