उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा देणारे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात दाखल


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले कट्टर शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याचा उद्धव ठाकरे यांना जाहीर इशारा देणारे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. MP Gajanan Kirtikar, who gave a public warning to Uddhav Thackeray, joined the Shinde group

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कीर्तिकर शिंदे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्या होता. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूक केली, ती चूक पुन्हा नको, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली.



 

पण, लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यक्रमाला दांडी मारली. लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष असलेले कीर्तिकर कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने लवकरच ते उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देतील, अशा चर्चा होत्या. आता कीर्तिकर शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंकडे केवळ ६ खासदारांचे बळ उरले आहे.

गजानन कीर्तिकर हे १९९० ते २००९ या काळात मालाड विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1995 मध्ये शिवसेना – भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गुरुदास कामत यांचा १ लाख ८३ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. ते सलग दोनदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

MP Gajanan Kirtikar, who gave a public warning to Uddhav Thackeray, joined the Shinde group

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात